पावसाळ्यात हिरव्या भाज्या जपून खाण्याचा सल्ला दिला जातो; परंतु या हंगामात बाजारात उपलब्ध असलेली एक विशिष्ट भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही भाजी दिसायला अगदी लहान, टोकदार दुधी भोपळ्यासारखी किंवा कारल्यासारखी असते, तिला इंग्रजीमध्ये कुंद्रू, ‘कांटोला’ (खेक्सा) वा आयव्ही गॉर्ड (Ivy Gourd) म्हणतात. पोषण आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या कांटोलाच्या नियमित सेवनाने केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासच मदत होत नाही, तर पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झांजर यांच्या मते, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी पारंपरिक औषधोपचार पद्धतीत कुंद्रूचा वापर केला जातो. कुंद्रूमधील काही जैव-सक्रिय संयुगे ग्लुकोज चयापचयावर परिणाम करू शकतात. तथापि, कुंद्रूला मधुमेहाच्या औषधांचा पर्याय मानले जाऊ शकत नाही. मधुमेही संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा समावेश करू शकतात; परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधोपचार बंद करावा. चला, एका तज्ज्ञाकडून जाणून घेऊया की, कुंद्रूच्या सेवनाने आरोग्याला कसे फायदे होतात आणि त्यात कोणती पोषक तत्त्वे असतात.

यात कॅलरीज कमी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात

कुंद्रू ही कमी उष्मांक (कॅलरीज) आणि तंतुमय पदार्थाने समृद्ध असलेली भाजी आहे. त्यात चरबीचे प्रमाणही खूप कमी असते. तसेच, त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, क जीवनसत्त्व, लोह आणि कॅरोटीनॉइड्स यांसारखी पोषक तत्त्वेही आढळतात. कमी उष्मांक असल्यामुळे, संतुलित आणि वजन नियंत्रणासाठीच्या आहारात हा एक उपयुक्त पर्याय ठरतो. कुंद्रूमध्ये विविध वनस्पतींपासून मिळू शकणारी बायोॲक्टिव्ह संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे होणारे पेशींचे नुकसान कमी करण्यात अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. ही भाजी कमी तेलात शिजवून खाल्ल्याने वजन नियंत्रणास मदत होईल. तथापि, कोणतीही एक भाजी गंभीर आजार टाळण्याचा खात्रीशीर मार्ग मानली जाऊ शकत नाही.

बद्धकोष्ठतेमुळे आराम मिळू शकतो

कुंद्रूमध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) हा घटक असतो. तंतुमय पदार्थ हा घटक मल नरम करण्यास आणि शौचाची क्रिया नियमित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे फायबरयुक्त संतुलित आहाराचा भाग म्हणून, कुंद्रूची भाजी बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तसेचबद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणेही महत्त्वाचे आहे.

लोह आणि त्याचा थकव्याशी असलेला संबंध काय ?

कुंद्रूमध्ये लोहासह अनेक पोषक तत्त्वे असतात. शरीरात हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यासाठी लोह आवश्यक असते. तथापि, केवळ कुंद्रू खाल्ल्याने ॲनिमिया किंवा सततचा थकवा बरा होऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल, तर त्याचे कारण शोधणे गरजेचे आहे.

मज्जासंस्थेसाठी पोषक तत्त्वे

कुंद्रूमध्ये काही ‘बी’ जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक असतात, जे शरीराच्या सामान्य ऊर्जा चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्यात भूमिका बजावतात. तथापि, त्याला मज्जासंस्थेच्या विकारांवरील इलाज म्हणणे योग्य ठरणार नाही.

कुंद्रूमध्ये आढळणारे जैव-सक्रिय संयुगे

कुंद्रूमध्ये फ्लेवोनॉइड्स, सॅपोनिन्स व टर्पेनॉइड्स यांसारखी वनस्पती-आधारित जैव-सक्रिय संयुगे आढळतात. या संयुगांच्या अँटिऑक्सिडंट आणि इतर संभाव्य आरोग्यदायी परिणामांवर संशोधन केले गेले आहे. तथापि, कुंद्रूला कोणत्याही रोगावरील इलाज म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.

कुंद्रू कसे खावे?

कुंद्रू एक साधी भाजी म्हणून तयार करून, तुमच्या आहारात समाविष्ट करता येते. ती कमी तेलात शिजवणे हा एक चांगला पर्याय आहे. ती इतर भाज्यांसोबतही एकत्र करून खाता येते. मधुमेह असलेल्या किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ती जास्त तेलात किंवा उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांमध्ये शिजवणे टाळावे.

कुंद्रू हे प्रत्येक आजारावरचे औषध आहे का?

मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, दमा, कावीळ, त्वचेचे संक्रमण किंवा आयबीएस (IBS) यांसारख्या आजारांवर कुंद्रू हा एक रामबाण उपाय आहे, असे सांगणे अचूक नाही. त्याचे काही पारंपरिक उपयोग आणि प्राथमिक संशोधन त्याचे आरोग्यदायी फायदे सूचित करतात; परंतु त्याला कोणत्याही आजारावरील रामबाण उपाय म्हणून संबोधण्यासाठी पुरेशा वैज्ञानिक पुराव्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याचा आपल्या आहारात एक पौष्टिक भाजी म्हणून समावेश करा; औषधांना पर्याय म्हणून नव्हे.