Food Pairing To Avoid With Lady Finger: भेंडीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भेंडी हे उन्हाळी पीक असून, लोक अनेकदा भाजी, भुजिया, लोणचे आणि रायता या स्वरूपात तिचे सेवन करतात. भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ते शरीराला अनेक फायदे होतात. विद्राव्य फायबरने समृद्ध असलेली भेंडी पचनसंस्था मजबूत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. भेंडी बद्धकोष्ठतेवरही उपचार करते आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य करते. भेंडीतील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करतात. त्यामुळे ह्रदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.

मात्र, आयुर्वेदानुसार काही अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यालाच ‘विरुद्ध आहार’ असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते, भेंडी काही विशिष्ट पदार्थांसोबत खाल्ल्यास पचन बिघडणे, अॅसिडिटी, त्वचेच्या समस्या किंवा इतर त्रास उद्भवू शकतात.

अलीकडेच सोशल मीडियावर एका व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आळा आहे की, भेंडीसोबत काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत विविध त्रास होऊ शकतात. युनानी औषधशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी स्पष्ट केले की, भेंडीसोबत काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे, जडपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. भेंडीसोबत काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचवू शकते. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…

भेंडीसोबत टाळाव्यात ‘या’ ५ गोष्टी

१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
भेंडीसोबत दूध किंवा दही खाल्ल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदानुसार ही संयोजना ‘विरुद्ध’ मानली जाते आणि त्यामुळे त्वचेच्या तक्रारी वाढू शकतात.

२. करेला (कारलं)
भेंडी आणि कारल्याचे गुणधर्म एकमेकांशी जुळत नाहीत. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास पोटदुखी किंवा अपचन होण्याची शक्यता वाढते.

३. मुळा
मुळा आणि भेंडी एकत्र खाल्ल्यास शरीरात रासायनिक प्रतिक्रिया होऊन त्वचेवर डाग किंवा अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

४. आंबट पदार्थ
भेंडीसोबत जास्त आंबट पदार्थ (उदा. चिंच, लिंबू) खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि अॅसिडिटी वाढू शकते.

५. मासे (फिश)
भेंडी आणि मासे एकत्र खाणे आयुर्वेदात टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्वचेचे विकार किंवा पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

आहारतज्ज्ञांच्या मते, ‘विरुद्ध आहार’ ही संकल्पना शरीराच्या पचनक्रियेवर आधारित आहे. चुकीच्या अन्नसंयोगामुळे शरीरात विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) तयार होऊ शकतात, ज्याचा परिणाम दीर्घकालीन आरोग्यावर होतो. भेंडी ही नक्कीच पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी आहे, पण ती योग्य अन्नपदार्थांसोबतच खाणे महत्त्वाचे आहे. संतुलित आणि सुसंगत आहार घेतल्यासच तिचे पूर्ण फायदे मिळू शकतात.