दिवाळीला लक्ष्मी-गणेशाची पूजा कशी करावी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि बीज मंत्र

दीपावलीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला ०४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.

lifestyle
दिवाळीत गणेश-लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी ०६.०९ ते ८.२० पर्यंत असणार आहे. (photo : file photo)

हिंदू पंचांगानुसार, दीपावलीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला ०४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. दीपावलीच्या दिवशी रिद्धी-सिद्धी दाता गणेशाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच धनाची देवता कुबेर, देवी सरस्वती यांचीही पूजा या दिवशी केली जाते. दिवाळीत गणेश-लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी ०६.०९ ते ८.२० पर्यंत असणार आहे. चला जाणून घेऊया दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी-गणेशाची पूजा कशी करावी.

दिवाळी २०२१- शुभ मुहूर्त

दिवाळी : ४ नोव्हेंबर,२०२१ गुरुवार
अमावस्या तिथि प्रारंभ: सकाळी ०६:०३ पासून.
अमावस्याची तिथी समाप्त: ०५ नोव्हेंबर २०२१, ०२:४४ पर्यंत.

लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ

सायंकाळी ०६ वाजून ०९ मिनटांपासून रात्री ०८ वाजून २० मिनटं
कालावधी: १ तास ५५ मिनिटे
प्रदोष काळ: १७:३४:०९ ते २०:१०:२७
वृषभ कालावधी: १८:१०:२९ ते २०:०६:२०

शहरांमध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त:

नवी दिल्ली : संध्याकाळी ०६:०९ ते रात्री ०८:०४ पर्यंत

नोएडा: संध्याकाळी ०६:०८ ते रात्री ०८: ०४ पर्यंत

पुणे: संध्याकाळी ०६:३९ ते रात्री ०८:३२ पर्यंत

जयपूर: संध्याकाळी ०६:१७ ते रात्री ०८:१४ पर्यंत

चेन्नई: संध्याकाळी ०६:२१ ते रात्री ०८:१० पर्यंत

गुरुग्राम: संध्याकाळी ०८:१० ते रात्री ०८:०५ पर्यंत

हैदराबाद: संध्याकाळी ०६:२२ ते रात्री ०८:१४ पर्यंत

चंदीगड: संध्याकाळी ०६:०७ ते रात्री ०८:०१ पर्यंत

मुंबई: संध्याकाळी ०६:४२ ते रात्री ०८:३५ पर्यंत

कोलकाता: संध्याकाळी ०५:३४ ते रात्री ०७:३१ पर्यंत

बंगळुरू: संध्याकाळी ०६:३२ ते रात्री ०८:२१ पर्यंत

अहमदाबाद: संध्याकाळी ०६:३७ ते रात्री ०८:३३ पर्यंत

या मंत्रांचा जप करून लक्ष्मीची पूजा करा –

ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।

ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।

ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।

लक्ष्मी-गणेशाची पूजा करण्याची पद्धत

लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचा घट घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी.

कथा आणि उत्सव: दिवाळीची पौराणिक कथा, जाणून घ्या

यासोबतच माता लक्ष्मीच्या श्री सूक्ताचे पठण करावे. या पद्धतीने कुबेर आणि माता सरस्वतीची पूजा करावी. सर्व देवतांची पूजा केल्यानंतर हवन करावे. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Laxmi puja vidhi muhurat timings samagri mantra rituals procedure scsm

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या