जेव्हा शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नाही, तेव्हा हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातून मिळणारं जीवनसत्व असेही म्हटलं जातं, कारण सूर्य हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, हाडांची घनता कमी होते आणि हाडे कमकुवत होऊन त्याबाबतच्या समस्या निर्माण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही निर्माण होऊ शकतो. व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक मानले जाते. यामुळेच शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा- लघवीवाटे किडनीतुन युरिक ऍसिडचे खडे बाहेर काढतील ‘ही’ चार पेय; १०० रुपयांहून कमी खर्चात राहा हेल्दी

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
HDL
‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ कसे वाढवायचे? डॉक्टरांकडून जाणून घ्या सोपे उपाय
Vitamin d
व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, हे कसे ओळखावे? जाणून घ्या त्याची लक्षणे ….

काही खाद्यपदार्थ ज्यामध्ये, फॅटी फिश आणि दुग्धजन्य पदार्थ हे व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत मानले जातात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेला पुरेसे आणि पौष्टीक अन्न पदार्थ खाऊन बर्‍याच प्रमाणात दूर केले जाऊ शकते. जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि स्नायूंच्या समस्या निर्माण होतात. त्याची कमतरता नवजात मुलांपासून तरुण आणि वयस्कर लोकांमध्येही आढळून येते. मात्र अनेकांना आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे वेळेवर जाणवत नाही, त्यामुळे त्यांना मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, हे कसं ओळखता येतं याबाबतची माहीती सांगणार आहोत.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे पुढीलप्रमाणे –

हेही वाचा- दारुसह Viagra खाणं जीवावर बेतलं! मेंदू व किडनीवर काही सेकंदातच असा झाला प्रभाव

  • स्नायू थकवा जाणवणे
  • हाडे दुखणे
  • सतत आजारी पडणे
  • मुलांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा वेदना
  • वारंवार संसर्ग होणे
  • थकवा जाणवणे
  • पाठदुखी
  • हाडांच्या समस्या उद्भवने
  • केस गळणे
  • स्नायू दुखणे
  • काळजी वाटणे

यासाठी व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी महत्त्वाचे –

हाडांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती यासह शरीराच्या अनेक आवश्यक कामांमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच कॅन्सरपासून आपला बचाव करण्यासही त्याची मदत होते. याव्यतिरिक्त, हाडांबाबतच्या समस्या दूर करणे. तसेच नैराश्य, हृदयरोग, मधुमेह आणि अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून आपला बचाव करण्याचे काम हे व्हिटॅमिन करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा उपचार सामान्यतः पूरक आहाराने केला जातो. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी, तुम्ही व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असलेल्या अन्न पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. शिवाय कोवळ्या उन्हात बसल्याने देखील हे व्हिटॅमिन तुम्हाला मिळते. परंतु उन्हाळ्यात अनेकांना उन्हात बसणं आवडत नाही त्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन डी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करु शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)