आज जगभरात आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो. जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वास्तविक, हा दिवस पाळण्याचा उद्देश जगभरातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात नागरी उड्डाणाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास

इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन दरवर्षी ७ डिसेंबर रोजी जगाच्या विविध भागात हा दिवस साजरा करते. १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाची स्थापना करण्यात आली. यूएन जनरल असेंब्लीने संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये १९९६ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिवस म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली. दरम्यान भारतात नागरी विमान वाहतूक १८ फेब्रुवारी १९११ रोजी सुरू झाली होती.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn the history significance and themes of international civil aviation day scsm
First published on: 07-12-2021 at 12:21 IST