scorecardresearch

६ तासांपेक्षा कमी झोपणं आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक; एक दोन नव्हे तर ‘या’ पाच आजारांचा उद्भवू शकतो धोका

झोप न येण्याची समस्या सर्वात जास्त तरूणांमध्ये पाहायला मिळत आहे

Side Effects of Sleeping Less
रात्री उशिरापर्यंत चालणारी पार्टी, मॉर्निंग शिफ्ट किंवा टेन्शनमुळे झोप पुर्ण न होण्याच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे. (Photo : Freepik)

रात्री उशिरापर्यंत चालणारी पार्टी, मॉर्निंग शिफ्ट किंवा टेन्शनमुळे झोप पुर्ण न होण्याच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे. झोप न लागणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. शिवाय झोप न येण्याची समस्या सर्वात जास्त तरूणांमध्ये पाहायला मिळत आहे. झोप न लागल्यामुळे चिडचिड, भूक न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात. आपल्या झोपेवर बदलत्या जीवनशैलीचाही मोठा प्रभाव आहे.

अनेक अभ्यांसामध्ये असं म्हटलं आहे की, चांगल्या आरोग्यासाठी तरुणांनी किमान सात ते आठ तास झोपायला पाहिजे. शिवाय जर पुरेशी झोप घेतली नाही, तर त्याचे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. आजकाल अनेक लोक सरासरी फक्त ६ तासांची झोप घेतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पुरेशी झोप न झाल्यामुळे ज्या समस्या उद्भवतात त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊया.

हेही वाचा- सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळे होतात कमजोर; काळजी घेण्याचे उपाय तज्ञांकडून जाणून घ्या

वजन वाढणे –

जर तुम्ही ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुम्हाला लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या समस्यांना सोमोरं जावं लागू शकतं. कमी झोपेमुळे कॉर्टिसोल, घरेलीन, लेप्टिनची पातळी वाढते, ज्यामुळे तुम्ही जास्त अन्न खाण्यास सुरुवात करता. याच परिणाम तुमच्या वजनावर होतो.

प्रतिकारशक्ती –

हेही वाचा- चहाप्रेमींची काळजी वाढवणारी बातमी! संध्याकाळचा चहा पिणं ठरू शकतं हानिकारक? कसं ते जाणून घ्या

पुरेशी झोप न मिळाल्याने हानिकारक जंतू आणि संक्रमणांशी लढण्याच्या शरीराच्या क्षमतेवरही परिणाम होतो. लोक किती झोप घेतात याचा थेट परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो.

स्मरणशक्तीवर परिणाम –

झोपेच्या कमतरतेमुळे अनेकांच्या मेंदूवरही परिणाम होतो. कालांतराने, झोपेच्या करमरतेमुळे शरीरातील काही हानिकारक प्रोटीन्सना बाहेर जाण्याचा मार्ग भेटतं नागही, ज्याचा परिणाम थेट स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारखे आजारही होण्याची शक्यता असते.

कर्करोग –

हेही वाचा- Lung Cancer: ‘या’ कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग; कसा ते जाणून घ्या

पुरेशी झोप न होणे हे देखील कर्करोग रोग होण्याचे कारण असू शकते. एका अभ्याससानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे कोलन, अंडाशय, स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, २०१० च्या अभ्यासात असेही आढळून आले की सहा तासांपेक्षा कमी झोपेमुळे आतड्यांसंबंधी कर्करोगाचा धोका ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

हृदयविकार –

सहा तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका आणि दीर्घकाळ स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की झोपेमुळे रक्तवाहिन्या दुरुस्त आणि बरे होण्यास मदत होते. झोपेदरम्यान, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला विश्रांतीसाठी थोडा वेळ मिळतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, झोपेसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 14:52 IST
ताज्या बातम्या