सौंदर्यभान : डॉ. शुभांगी महाजन

बऱ्याच व्यवसायांत तुमचा चेहरा म्हणजे तुमची पहिली छाप असतो. मग अशा वेळी चेहरा आकर्षक दिसणे आणि स्वत:ला योग्यरीत्या सादर करणे आवश्यक असते. सध्याच्या युगातील तणाव आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता त्वचेतील तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी बरेच उपचार उपलब्ध आहेत. ‘हायफू ट्रीटमेंट’ हा त्यापैकी एक आहे.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

हायफू ट्रीटमेंट म्हणजे काय?

हा एक अत्यंत लोकप्रिय, आक्रमक नसलेला, उच्च तीव्रतेवर केंद्रित अल्ट्रासाऊंड (ऌ्रॠँ कल्ल३ील्ल२्र३८ोू४२ी िव’३१ं२४ल्ल)ि  उपचार आहे जो सूक्ष्म-तेंद्रित, तीव्र, एकाग्र अल्ट्रासाऊंड लहरी वापरून आपला चेहरा आणि मानेची त्वचा घट्ट करण्यास मदत करतो. या लहरी अधिक कोलॅजेन उत्पादनास उत्तेजित करतात आणि ऊतींचे कायाकल्प सुधारतात. परिणामी त्वचा नैसर्गिक, तरुण मोहक, टवटवीत आणि चमकदार होण्यास मदत होते. हे चेहऱ्यापासून छातीपर्यंतच्या भागात एक ताजे, नैसर्गिक, तेजस्वी, अधिक तरुण स्वरूप प्राप्त करण्यास मदत करते.  

प्रक्रिया

सर्वप्रथम रुग्णाच्या चेहऱ्यावर किंवा लक्षित क्षेत्रावर एक गुळगुळीत असा उपकरणाचा हॅण्डपीस ठेवला जातो जेणेकरून प्रक्षेपित केलेल्या सर्व ऊतकांची प्रतिमा अभ्यासासाठी मॉनिटरवर प्राप्त होईल. संदर्भासाठी बनवलेल्या ग्रिडलाइन्सचा वापर करून लक्षित क्षेत्र पुढील उपचाराच्या मार्गदर्शनासाठी चिन्हांकित केले जाते.  त्याच हॅण्डपीसचा वापर केंद्रित अल्ट्रासाऊंड ऊर्जेच्या लहान पल्सेसना रेषीय पद्धतीने वितरित करण्यासाठी केला जातो. या अल्ट्रासाऊंड वेव्हस ऊतींना अतिशय हळूवारपणे तापवतात, जे शरीराच्या नैसर्गिक कोलॅजेन उत्पादन प्रक्रियेला उत्तेजित करते. ज्यामुळे जुन्या आणि वृद्ध कोलॅजेनची जागा नवीन कोलॅजेन घेते. परिणामी त्वचा अधिक दृश्यमान, उन्नत नैसर्गिक दिसण्यास मदत होते. त्वचा घट्ट होण्यासाठी त्वचेच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे हॅण्डपीस वापरले जातात.

अपेक्षित परिणाम

या उपचारांचे परिणाम अत्यंत दृश्यमान आणि नैसर्गिक दिसणारे आहेत. सुरुवातीला प्रक्रियेनंतर लगेचच त्वचा घट्ट दिसायला लागते, जी मुख्यत्वे उपचारात वापरली जाणारी उष्णता आणि परिणामी जळजळ यांमुळे होते. असे असले तरी, नव्याने तयार झालेले कोलॅजेन परिपक्व झाल्यामुळे खरे परिणाम दोन-तीन महिन्यांत दिसू लागतात.

परिणाम किती काळ टिकतात? 

सामान्यत: परिणाम सुमारे एक ते दोन वर्षे टिकतात. परंतु जर तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेतली आणि सक्रिय जीवनशैलीसह संतुलित आहार एकत्र केला तर परिणाम अधिक काळ टिकू शकतात.

 फायदे

’  प्रत्येक व्यक्तीचे चेहऱ्याचे शरीरशास्त्र वेगळे असते, म्हणूनच व्यवस्थित योजना करून उपचार करणे महत्त्वाचे आहे जे तुम्हाला हायफू ट्रीटमेंट घेत असताना शक्य आहे.

’ उपचार प्रभावी आहेत. कमी वेळेत दृश्यमान, दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळवता येतात.  

’ रक्तवाहिन्या, हाडे आणि मज्जातंतूंना कोणतेही नुकसान होत नाही.

’ त्वचेवर कोणतीही अनावश्यक जखम, सुन्नपणा, रक्तस्राव, चीरा किंवा जळजळ दिसून येत नाही .

’ प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचे प्रकार आणि त्वचेच्या गरजा लक्षात घेऊन उपचार करता येतात.