हिवाळा म्हटलं की सर्वांना आठवते शरीर गोठवणारी थंडी आणि थंडी म्हटलं की डोळ्यासमोर येतो गरमागरम चहा. मात्र, थंडीच्या दिवसांमध्ये चहा कितीती प्यावासा वाटला तरी, अनेक लोकांना शाररिक समस्यांमुळे चहा पिणं शक्य नसतं. पण थंडीमध्ये काम करताना मनाचा आणि शरीराचा थकवा घालवण्यासाठी सर्वांना चहा प्यावासा वाटतोच. त्यामुळे चहा न पिणारे देखील “आपण साखरेचा नाही, पण गुळाचा चहा पितो” असं सांगत चहा पितात.

दरम्यान, सध्या लोकांना गुळाचा चहा मोठ्या प्रमाणात आवडायला लागला आहे. त्यामुळेच शहरात रस्त्यावरच्या टप्परीवर मोठ्या अक्षरात ‘येथे गुळाचा चहा मिळेल’ असे बोर्ड लावलेले दिसतात तर या टपऱ्यांसमोर चहा प्रेमींच्या लागलेल्या रांगा आपणला पाहायला मिळतात. त्यामुळे गुळाच्या चहाची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण नाकारु शकत नाही.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Would you like to try egg roti or chapati for breakfast Note The Easy Recipe and try ones at home
नाश्त्यासाठी झटपट काय बनवायचं असा प्रश्न पडतोय? फक्त चार पोळ्या अन् अंडी वापरून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
side effects of vitamin B3
‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा

आणखी वाचा- चहाप्रेमींनो, तुम्ही पण थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पिताय? मग आताच थांबा, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर परिणाम

मात्र, आपण पितोय तो गुळाचा चहा आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? याबाबत अनेक मतभेद आहेत. शिवाय आयुर्वेदामध्ये दुध आणि गुळ यांना विरुद्ध आहार म्हटलं आहे. त्यामुळे गुळाचा चहा पिण्याला आयुर्वेदात तरी मान्यता नाही. कारण गुळ आणि दुधाला ते विरुद्धहार मानतात. विरुद्ध आहार म्हणजे, असे काही अन्नपदार्थ की, त्यांच्या चुकीच्या मिश्रणामुळे आपल्या शरीरात विष तयार होऊ शकते आणि त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

त्यामुळेच दुध आणि गुळ हे एकत्रित केल्यास ते शरीराला हानिकारक ठरू शकतात असं मतं आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रेखा राधामणी यांनी व्यक्त केलं आहे. त्या आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहितात, अनेक अन्नपदार्थांच्या चुकीच्या मिश्रणामुळे शरीरात विष तयार होऊ शकते. प्रत्येक अन्नाची वेगळी गुणवत्ता असते. त्यानुसार हे दूधाची गुणवत्ता थंड आहे तर गूळ उष्ण आहे. त्यामुळे आपण जेव्हा उष्ण अन्न, शीत ऊर्जायुक्त अन्नामध्ये मिसळतो तेव्हा ते चुकीचं मिश्रण होतं आणि त्यामुळे आपणाला पित्तासह आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

त्यामुळे कोणत्याही पदार्थाचं मिश्रण करताना त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा, असा सल्ला त्या देतात. दरम्यान आयुर्वेदानुसार अन्नपदार्थांचे चुकीचे मिश्रण कोणते ते जाणून घेऊयात. केळी आणि दुध, दुध आणि मासे, मध आणि तूप या पदार्थांचे मिश्रण आयुर्वेदानुसार चुकीचे मानले जाते.