‘या’ ३ प्रकारच्या दिव्यांनी उजळून टाका तुमचं घर, आणि साजरी करा पर्यावरणपूरक दिवाळी

ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी तुम्ही शेणापासून बनवलेल्या दिव्यांचाही वापर करू शकतात.

lifestyle
ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी तुम्ही शेणापासून बनवलेल्या दिव्यांचाही वापर करू शकतात.(photo: indian express)

दिव्यांचा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आनंद आणि प्रकाशाचा हा सण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. संपूर्ण देश फटाक्यांच्या आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. या सणात सर्वत्र दिवे आणि दिवे पाहून मन अगदी प्रकाशमय झाल्यासारखे वाटते, परंतु या काळात आपण पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे.

तुम्ही प्रत्येक दिवाळीत एलईडी दिवे वापरता आणि ते तुमच्या घराच्या सजावटीला शोभा वाढवतात यात शंका नाही. पण या वेळी पर्यावरणाची जाणीव ठेवून या दिवे ऐवजी पर्यावरणपूरक दिवा का वापरू नये? पर्यावरणपूरक दिवे तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याला प्रकाश देतील आणि याने पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही. अशा तीन प्रकारच्या दिव्यांविषयी सांगत आहोत जे तुम्ही वापरू शकता.

पर्यावरणपूरक दिव्यांचे तीन प्रकार

मातीचे दिवे

या वेळी दिवाळीत फक्त मातीचे दिवे वापरा आणि घर उजळून टाका. मातीचे दिवे केवळ पर्यावरणाचेच नुकसान करणार नाहीत, तर कुंभार आणि छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदतही करतील. मातीचे दिवे वापरून विजेचीही बचत होणार आहे.

बांबूचे दिवे

मातीच्या दिव्यांव्यतिरिक्त तुम्ही बांबूपासून बनवलेले दिवे देखील वापरू शकता. हे दिसायला खूप ट्रेंडी दिसते आणि हे दिवे पर्यावरणाला हानी पोहचवत नाही. तुम्हाला हे दिवे अनेक प्रकारेमध्ये, योग्य किंमती आणि डिझाइनमध्ये सापडतील. त्यांच्या वापरामुळे केवळ पर्यावरणच वाचणार नाही, तर या उपक्रमामुळे गावांमध्ये आणि दुर्गम भागातील महिलांनाही मदत होईल कारण त्यामुळे रोजगार निर्माण होईल.

शेणाचे दिवे

ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी तुम्ही शेणापासून बनवलेल्या दिव्यांचाही वापर करू शकतात. पीओपी दिव्यांमुळे जलप्रदूषण होते, परंतु पर्यावरण लक्षात घेऊन काही काळासाठी शेणाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. यावेळी दिवाळीत पारंपरिक मातीच्या दिव्यांऐवजी तुम्ही वेगळ्या प्रकारचे दिवे वापरून पाहू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Light up your home with these 3 types of lights and celebrate environmentally friendly diwali scsm

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या