अमर्याद रक्तपुरवठा लवकरच वास्तवात

उपचार करण्यासाठी याची मोठी मदत होणार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शास्त्रज्ञांनी प्रथमच रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशी प्रयोगशाळेत तयार केल्याने यापुढे मानवी रक्ताचा अमर्याद पुरवठा करता येणे शक्य होणार आहे. रक्तातील आजारांवर उपचार करण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.

शरीरातील सर्व पेशी तयार करण्याचे काम स्टेम सेल करतात. शरीरातील एखादी पेशी नष्ट  अथवा खराब झाली असेल तर ती नव्याने तयार करण्याचे काम स्टेम पेशी करतात. या आधारावर रोगप्रतिकारक रक्ताच्या पेशी स्टेम पेशींच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतात. रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

स्टेम पेशींपासून रक्ताच्या पेशी तयार करण्याचा आमच्या प्रयत्नाला यश येत असून, आम्ही त्याच्या अतिशय जवळ असल्याचे, अमेरिकेतील मुलांच्या रुग्णालयामधील जॉर्ज डॅले यांनी म्हटले आहे.

पेशींची निर्मिती प्लुरीपोटेन्ट स्टेम पेशींपासून होते. प्लुरीपोटेन्ट स्टेम पेशी अनेक प्रकारच्या मानवी रक्ताच्या पेशी उंदरांमध्ये निर्माण करतात, असे संशोधकांनी सांगितले.

या रक्त पेशींची निर्मिती झाल्यामुळे आनुवंशिक रक्ताचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच इतर ठिकाणी रक्ताचा पुरवठा करण्यासाठीही याची मदत होऊ शकणार असल्याचे, जॉर्ज डॅले यांनी म्हटले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Limitless blood supply soon in real life

ताज्या बातम्या