Fatty Liver Disease: फॅटी लिव्हर ही आजकाल वेगाने वाढणारी समस्या आहे, जी देशातील लोकसंख्येच्या बहुतांश लोकांमध्ये आहे. अनेक अहवालांमधून असे दिसून आले आहे की, अंदाजे ४० टक्के भारतीय फॅटी लिव्हरने ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करून फॅटी लिव्हरवर उपचार केले जाऊ शकतात.
लिव्हरसाठी कॉफी कशी फायदेशीर आहे?
अनेक अभ्यास आणि डॉक्टर सांगतात की, निरोगी आहारासोबत दररोज कॉफी पिणे तुमच्या लिव्हरसाठी फायदेशी आहे. अशावेळी तुम्हाला ते योग्यरित्या कसे प्यावे हे माहीत असणे आवश्यक आहे. कॉफीमध्ये जास्त अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरमधील चरबी काढून टाकण्यास मदत करतात, चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात आणि लिव्हरचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. कॉफीचे पूर्ण फायदे घेण्यासाठी आणि फॅटी लिव्हर टाळण्यासाठी ती अशी पद्धतीने तयार करा…
ब्लॅक कॉफी
लिव्हरच्या आरोग्यासाठी आणि कॉफीचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी उत्तम. ब्लॅक कॉफी बनवताना साखर, दूध, क्रीम किंवा सिरप अजिबात वापरू नका.
दूध काळजीपूर्वक वापरा
जर तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकत नसाल, तर तुम्ही कमी फॅट असलेले दूध किंवा स्किम्ड मिल्क वापरू शकता. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित असावे. कॉफीचा कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडरही वापरू शकता.
अहवालांनुसार, दररोज २ ते ४ कप ब्लॅक कॉफी पिणे स्वीकार्य आहे. अशावेळी जर तुम्हाला उच्च रक्तदाब, पचन किंवा झोपेशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कॉफी पिणं टाळणं उत्तम.
