Liver Stone symptoms: ‘खडे’ म्हटल्यावर अनेकदा सर्वप्रथम मूत्रपिंडातील खड्यांचा विचार मनात येतो. परंतु, ही समस्या त्यापलीकडेही विस्तारलेली आहे. शरीरात केवळ पित्ताशयातच नव्हे, तर इतर भागांतही खडे तयार होऊ शकतात. यकृतामध्येही खडे तयार होऊ शकतात, ज्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘इंट्राहेपॅटिक बाइल डक्ट स्टोन्स’ असे म्हटले जाते आणि याचा संबंध अनेकदा आजच्या काळातील चुकीच्या जीवनशैलीशी असतो. त्यामुळे विविध आजार उद्भवतात. तरीही डॉक्टरांच्या मते, ही विशिष्ट समस्या तुलनेने फारच कमी लोकांमध्ये आढळते. या स्थितीत यकृतामधील पित्तवाहिन्यांमध्ये खडा तयार होतो किंवा अडकतो. जर तुम्हाला यकृताच्या भागात वेदना होत असतील किंवा पोटाशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर तुम्ही यकृताची तपासणी करून घेतली पाहिजे. यकृताच्या तपासणीद्वारे ही स्थिती सहजपणे ओळखता येत असल्याने यकृतातील खड्यांशी संबंधित लक्षणे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी हा लेख वाचूया.

यकृतामध्ये खडे का तयार होतात?

शरीर निरोगी ठेवण्यात आणि मेदाच्या (चरबीच्या) पचनात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. पित्त यकृतापासून पित्तनलिकेद्वारे पित्ताशयात आणि त्यानंतर आतड्यांपर्यंत पोहोचते. या प्रक्रियेमुळे खडे तयार होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.

तुम्ही हे कसे जाणून घेऊ शकता?

तुम्ही विविध प्रकारच्या चाचण्या करून घेऊ शकता; परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यकृताची चाचणी (लिव्हर टेस्ट) करून घेणे सर्वोत्तम ठरेल.

यकृत कार्य चाचणी

  • अल्ट्रासाऊंड
  • एमआरसीपी
  • सीटी स्कॅन

पित्ताशयाच्या खड्यांची लक्षणे

  • तीव्र पोटदुखी
  • तीव्र ताप आणि थंडी वाजून येणे
  • डोळे आणि त्वचा पिवळी पडणे
  • लघवीच्या रंगात बदल
  • फिकट रंगाचा शौच

पहिल्या टप्प्यात दिसून येणारी सुरुवातीची लक्षणे

पित्ताशयातील खड्यांमुळे पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात. या वेदना प्रामुख्याने उजव्या बाजूला जाणवतात आणि त्यासोबत अनेकदा जडपणाची भावनाही असते. मात्र, कधी कधी या वेदनांना ‘गॅस’चा त्रास समजण्याची चूक होऊ शकते आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पित्ताशयातील खड्यांमुळे अस्वस्थता जाणवते आणि काहीही खाल्ल्यानंतर पोटात दुखू लागते.

त्याव्यतिरिक्त पोट फुगणे किंवा गॅस होणे अशा तक्रारी उद्भवू शकतात

सतत मळमळणे किंवा अधूनमधून उलट्या होणे हीदेखील सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय भूक मंदावल्यासारखे वाटत असेल किंवा खाण्याची इच्छा होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे करणे दीर्घकाळपर्यंत धोकादायक ठरू शकते.