तरुणांमध्ये वाढू लागलंय Love Addiction; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर आताच सावध व्हा

यामध्ये एखादी व्यक्ती हळू हळू स्वतः पेक्षा दुसऱ्यांना अधिक प्राथमिकता देऊ लागते. प्रत्येक वेळी, त्यांना कसं खुश ठेवता येईल याचा विचार करते.

love addiction
प्रेम करणे चांगले आहे परंतु जेव्हा ही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर जाते तेव्हा तिला 'लव्ह अ‍ॅडिक्शन' असे म्हणतात. (Photo : Pixabay)

प्रेम ही एक सुंदर भावना आहे. एखाद्यावर आपण प्रेम करणे आणि त्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम करणे ही गोष्ट आपल्याला आनंद देते. प्रेम करणे चांगले आहे परंतु जेव्हा ही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर जाते तेव्हा तिला ‘लव्ह अ‍ॅडिक्शन’ (Love Addiction) असे म्हणतात, म्हणजेच प्रेमाचे व्यसन. यामध्ये एखादी व्यक्ती हळू हळू स्वतः पेक्षा दुसऱ्यांना अधिक प्राथमिकता देऊ लागते. प्रत्येक वेळी, त्यांना कसं खुश ठेवता येईल याचा विचार या व्यक्ती करतात. हे व्यसन असणाऱ्या व्यक्ती खूपच भावनिक होतात. एक प्रकारचा जोश त्यांच्यावर कायम असतो. त्यामुळे त्या अगदी सहज डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत आहेत का? काही लक्षणांवरून आपण माहित करून घेऊ शकतो की तुम्ही देखील प्रेमाच्या व्यसनाच्या अधीन तर गेला नाहीत ना आणि यातून बाहेर कसे यावे.

मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार निवडताना मनात शंका येते? अशाप्रकारे तपासा प्रोफाइलची सत्यता

सतत आपल्या आवडत्या व्यक्तीकडे जाण्यासाठी काही ना काही कारण शोधणे

जी व्यक्ती प्रेमाच्या व्यसनाच्या अधीन असते त्यांना सतत प्रेमाची गरज भासते. तथापि, सुरुवातीच्या काही काळापर्यंत हे ठीक आहे परंतु जेव्हा हे संपायचे नाव घेत नाही तेव्हा तुम्ही सतर्क व्हायला हवे. कारण यादरम्यान कळत नकळत तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीकडे जाण्याची कारणं शोधत असता. अशात आपले लक्ष विचलित करण्याची गरज आहे. कारण हळू हळू तुम्ही त्यांच्या अधीन होत असता.

आपल्या जोडीदाराला प्राथमिकता देणे

बऱ्याचदा अनेक लोक आपल्या जोडीदाराला सर्वस्व मानतात. यामुळे त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त इतर काहीच दिसत नाही. या व्यक्ती आपल्या जोडीदाराशिवाय काही काळही एकट्या राहू शकत नाहीत. तुम्हालाही असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या अधीन झाला आहात. अनेक चुका असून देखील तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये फक्त चांगल्याच गोष्टी दिसतात. जोडीदाराच्या चुकीच्या वर्तनावर तुम्ही कधीच ठोस निर्णय घेऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्वस्व मानता तर तुम्हाला थोडं थांबायला हवं.

अनेक वर्षांच्या सहवासानंतरही ‘या’ कारणामुळे विभक्त होतात पतिपत्नी; लगेचच स्वभावात करा सुधारणा

एकटं न राहू शकणे

याशिवाय तुम्ही त्यांच्याशिवाय एकटे राहू शकत नाही. हे लव्ह अ‍ॅडिक्शन म्हणजेच प्रेमाच्या व्यसनाचे सर्वात मोठे लक्षण आहे. यादरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदाराशिवाय एकटे राहू शकत नाही. या परिस्थितीत, जोडीदाराशिवाय एकटे राहणेही तितकेच महत्वाचे आहे, हे तुम्ही स्वतःला समजावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Love addiction increased among youth be careful if you are facing this problems pvp

Next Story
Health Tips : पोटातून येणारा गुडगुड आवाज गंभीर आजारांचं लक्षण ठरू शकतं! ‘हे’ पदार्थ खाणं ताबडतोब सुरू करा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी