कॉफी प्रेमींना तर दररोज सकाळी उठल्यावर तसेच दिवसाची खरी सुरुवात करण्यासाठी पहिला कॉफीचा एक घोट हा घ्यावाच लागतो. तेव्हाच दिवसाला सुरुवात होते. तर कधी कामाचा जास्त ताण असला कि गरम कॉफीचा कप, त्यातल्या वाफाळलेल्या कॉफीचा एक सिप तुमचा मूड अगदी फ्रेश करतो. पावसाळ्याच्या दिवसात कॉफी तुम्हाला अगदी उबदारपणा तसेच आराम देते. मात्र, तुम्ही जर सतत अतिरिक्त प्रमाणात कॉफीच सेवन करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी ते हानिकारक देखील ठरू शकतं. ह्यावर एक उपाय आहे. ज्याप्रमाणे, दररोज आपली जेवण करण्याची तसेच ब्रेकफास्टची वेळ या आपण ठरवलेल्या असतात. त्याचप्रमाणे दिवसभरात कॉफी घेण्याची ठराविक वेळ ठरवावी. तसेच तुम्ही जास्त वेळ कॉफी घेणे टाळावे. याने तुमच्या शरीराला कोणतेही वाईट परिणाम होत नाही.

कॉफी सतत पित राहिल्याने तुमची चयापचय क्रिया मंद होत असेल तर तुम्ही कॉफीचे सेवन करणे टाळावे. याच बरोबर कॉफी जास्त प्यायल्याने जर तुम्हाला रात्री झोप येण्यास समस्या येत असेल तर कॉफीचे सेवन टाळावे. चला तर मग जाणून घेऊयात केव्हा कॉफीचे सेवन करणे टाळावे.

कॉफी पिणे केव्हा टाळावे?

– गर्भवती महिलांनी जास्त कॉफीचे सेवन करू नये. तसेच काहींना जेवण केल्यावर काही वेळेनंतर कॉफी पिण्याची सवय असते. अशांनी फॅमिली डॉक्टरांना विचारून कॉफीचे सेवन करावे.

– तुम्हाला जर रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय असेल तर कधीच रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन करू नये.

– तुम्हाला जर एसिडिटी झाली असेल तर अशा वेळी कॉफी पिणे टाळावे. कॉफी पिण्याआधी काही तरी खावे.

– तुम्ही जर काम करताना एखाद्या गोष्टीच्या तणावाखाली असाल तर सर्व कॅफिनयुक्त पेये टाळा. यावेळी तुम्ही डिकॅफची निवड करू शकता.

– तुम्ही जर दिवसातून ४०० मिलीग्राम कॉफी पित असाल तर ते टाळावे कारण कॉफीमध्ये अधिक प्रमाणात कॅफिनचे अनेक गोष्टींचा समावेश असल्याने याचा शरीराला वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसातून फक्त ३ ते ४ वेळा कॉफीचे सेवन करू शकता.