बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागते. तुम्ही जे खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत अनेक प्रकारचे आजार तुमच्या अवतीभवती येऊ लागतात. कोलेस्टेरॉल कमी होणे ही देखील एक मोठी समस्या आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही ड्रायफ्रूट्सचा समावेश करून तुम्ही वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.

शरीरात २ प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते

तुमच्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. पहिले चांगले आणि दुसरे खराब. जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढू लागले तर हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुमचे कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवणे खूप गरजेचे आहे. चला जाणून घेऊया कोणते आहेत असे ड्राय फ्रूट्स, ज्याद्वारे तुम्ही वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

अक्रोड सेवन करा

अक्रोडामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. हा एक असा ड्राय फ्रूट आहे, जो तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतो.अक्रोडात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्सही चांगल्या प्रमाणात आढळतात.

बदामाचे सेवन करा

तुम्ही पाहिले असेलच की फिट राहण्यासाठी रोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये अमिनो अॅसिड असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करतात. दररोज बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते.

पिस्त्याचे सेवन करा

पिस्तेही रोज खावेत. रोज काही प्रमाणात पिस्ते खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.

दुधी भोपळाच्या बिया खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही दुधीभोपळाच्या बिया फायदेशीर आहेत. जर तुम्ही तुमच्या आहारात बियांचा समावेश केलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)