LPG Cylinder: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन संकट असून भारतातही इंधनाचा, एलपीजीचा तुटवडा दिसून येत आहे. एलपीजीच्या क्रायसिसच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना एलपीजीबद्दल सातत्याने जागरूक करत आहेत. एलपीजीचा पुरवठा सामान्य आहे असं आश्वासन ऑईल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना सातत्याने देत असून आपल्या गरजेनुसार घरबसल्या सिलेंडर बुक करावेत, असंही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात, भारत पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही सिलेंडर बुक केला असेल आणि तुम्हाला वेळेवर डिलिव्हरी मिळणार असेल, तर घाईघाईने सिलेंडर घेणे टाळा. एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी घेताना ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नुकसान होऊ शकतं.
गॅस लीकेज
तुमच्या घरी एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी आली की त्याच्या नोजलवर लागलेली सील आणि सेफ्टी कॅप जाणून तपासून घ्या. कारण कधी सिलेंडर लीक होऊन जातो. जर असं झालं तर जीवाचा सुद्धा धोका उद्भवू शकतो आणि यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्हाला गॅसचा वास येत असेल किंवा कोणतीही संशयास्पद परिस्थिती वाटली, तर सिलेंडर घेण्यास ताबडतोब नकार द्या आणि संबंधित डिलिव्हरी एजंटला लगेच कळवा. गॅस गळती हा एक गंभीर धोका आहे. ज्यामुळे आग लागण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका वाढतो.
सिलेंडरचं वजन
देशात घरगुती गॅस सिलेंडरचं वजन हे १४.२ किलोग्राम असतं. पण काही डिलिव्हरी बॉय गॅस ब्लॅक करण्यासाठी सिलेंडरमधून काही किलो गॅस काढून घेतात. ज्यामुळे उपभोक्त्यांना पूर्ण गॅस मिळत नाही. तेव्हा ग्राहकांनी सतर्क रहावे आणि डिलिव्हरी दरम्यान वजन नक्की तपासावे.
सेफ्टी टेस्टिंग कोड
एलपीजीच्या प्रत्येक सिलेंडरवर एक सेफ्टी टेस्टिंग कोड लिहिलेला असतो. ज्यामुळे समजतं की याचा वापर करणं सुरक्षित आहे की नाही. हा कोड सिलेंडरच्या पुढील हायड्रोस्टॅटिक चाचणीची तारीख दर्शवतो.
कॅश मेमोनुसार पेमेंट
एलपीजी सिलेंडर खरेदी करताना लक्षात ठेवण्याची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या कॅश मेमोवर (पावतीवर) जो आकडा लिहीलेला असेल, नेमकी तेवढीच रक्कम द्यावी. काहीवेळा असं होतं की लोकं पावती नीट न तपासता पैसे देतात, ज्यामुळे जास्त पैसे आकारले जाऊ शकतात. म्हणूनच, डिलिव्हरी झाल्यावर बिल नक्की तपासा आणि त्यानुसारच पैसे द्या. यामुळे पारदर्शकता टिकून राहते आणि फसवणूकही टाळता येते.
