Lunar Eclipse May 16 2022: वर्षातील पहिल्या आंशिक सूर्यग्रहणानंतर, आपण आता २०२२ च्या पहिल्या चंद्रग्रहणाच्या जवळ आलो आहोत. हे चंद्रग्रहण पृथ्वीच्या विविध भागांतून दिसणार आहे. या वर्षी १५ आणि १६ मे रोजी हे ग्रहण होणार आहे. यावेळी चंद्र ‘सुपरमून’ असेल तसेच तो लालसर रंगात दिसेल. चंद्रग्रहणाच्या आधी, तुम्हाला त्याबद्दल काही माहित असणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रहण कधी होईल, कुठे दिसेल?

२०२२ चे पहिले चंद्रग्रहण या शनिवार आणि रविवार, अर्थात १५ मे आणि १६ मे रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, १६ मे रोजी सकाळी ०७.०२ वाजता ग्रहण होईल आणि दुपारी १२.२० वाजता समाप्त होईल. मात्र, चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. नासाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या पूर्वेकडील अर्धा भाग आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेला चंद्रग्रहणाचा प्रत्येक टप्पा पाहण्याची संधी मिळेल. संपूर्ण आफ्रिका, पश्चिम युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि बहुतेक उत्तर अमेरिकेत दृश्यमान होईल असं यूएस स्पेस एजन्सीने सांगितले आहे.

(हे ही वाचा: Lunar Eclipse 2022: ‘या’ राशींना चंद्रग्रहणामुळे करिअरमध्ये होऊ शकते प्रचंड प्रगती, धनलाभाचे आहेत योग!)

चंद्रग्रहण कसे पाहावे?

आपल्याकडे हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे तुम्ही नासाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते थेट पाहू शकता. नासा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि अधिकृत युट्युब चॅनेलवर याचे थेट प्रसारण देखील करणार आहे.

चंद्रग्रहण नक्की कधी होते?

जेव्हा चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या अगदी विरुद्ध बाजूस असतात तेव्हा चंद्रग्रहण होते, परिणामी चंद्रावरील सूर्यप्रकाश पूर्णपणे अवरोधित होतो. या वर्षी, चंद्रग्रहण देखील ‘ब्लड मून’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या घटनेला कारणीभूत ठरेल. ब्लड मून दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर लालसर रंगाची छटा दिसते, जी त्याला एक अद्वितीय स्वरूप देते.

नासा याबद्दल सांगते की, “ग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणात जितकी जास्त धूळ किंवा ढग असतील तितका चंद्र लाल दिसेल. १६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण हे या वर्षी होणार्‍या दोन चंद्रग्रहणांपैकी पहिले चंद्रग्रहण असेल. दुसरे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला होणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lunar eclipse chandra grahan may 16 2022 date timings in india ttg
First published on: 15-05-2022 at 13:10 IST