Avocado vs Amla Health Benefits :हिवाळा सुरू होताच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. तापमान घटल्याने, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने आणि हालचाली कमी झाल्याने चयापचय मंदावते, ज्यामुळे शरीर व्हायरस आणि संसर्गांपुढे असुरक्षित होतं. या काळात ऊन कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीचे प्रमाण घटते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अनेक लोक या काळात पाणी कमी पितात, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (toxins) बाहेर पडत नाहीत, आणि थकवा, सर्दी-खोकला, घशात दुखणं यांसारख्या तक्रारी वाढतात. म्हणूनच हिवाळ्यात कोमट पाणी पिणं, व्हिटॅमिन सी भरपूर असलेले पदार्थ खाणं, आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवणं गरजेचं असतं.
हिवाळ्यात आवळ्याचं महत्त्व
भारतीय घराघरात हिवाळा आला की आवळ्याचं सेवन केलं जातं.आवळा च्यवनप्राश, मुरंबा किंवा रसाच्या स्वरूपात खाल्ला जातो. फळ व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्रोत आहे, जो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो आणि आजारांपासून बचाव करतो.
दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स्य सांगतात,”रोज एक आवळा खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी लेव्हल नियंत्रणात राहतो.” यात असलेले पॉलीफेनॉल्स कॅन्सरपासून संरक्षण करतात आणि DNA डॅमेज कमी करतात. अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलला ऑक्सिडाइज होण्यापासून रोखतात.जेव्हा LDL कोलेस्ट्रॉल रक्तात ऑक्सिजनच्या संपर्कात येतं, तेव्हा त्यावर ऑक्सिडेशन प्रक्रिया होते आणि ते ऑक्सिडाइज्ड LDL” बनतं. धमन्या स्वच्छ ठेवतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात. फक्त एक लहान आवळा दिवसभराच्या व्हिटॅमिन सीची गरज पूर्ण करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर — आवळा म्हणजे नैसर्गिक हेल्थ बूस्टर!
अॅव्होकॅडोचे आहेत अनेक फायदे
दुसरीकडे, सोशल मीडियावर सध्या अॅव्होकॅडो खाण्याचा जबरदस्त ट्रेंड आहे. इंस्टाग्रामवरील हेल्दी रेसिपी, सॅलड्स, स्मूदीमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हा एक विदेशी पदार्थ असला तरी तोही अनेक बाबतीत फायदेशीर आहे.
हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलचे सीनियर फिजिशियन आणि डायबिटोलॉजिस्ट डॉ. सुमन गुप्ता सांगतात, अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स (Monounsaturated fats) असतात, जे हृदयासाठी चांगले असतात.हे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात.यात असलेले फायबर पचन सुधारतं आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. तसेच यात पोटॅशियम, व्हिटॅमिन K, E, आणि फोलेट असतात, जे हाडं, स्नायू आणि नर्व्हस सिस्टमसाठी उपयुक्त आहेत.
हिवाळ्यात काय खावे — आवळा की अॅव्होकॅडो?
आवळा व अॅव्होकॅडो… दोन्ही सुपरफूड्सचे स्वतःचे फायदे आहेत — पण भारतीय शरीररचनेनुसार आणि हिवाळ्याच्या गरजेनुसार आवळा अधिक उपयोगी ठरतो.
डॉ. गुप्ता यांच्या मते,”जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य सुधारायची असेल तर अॅव्होकॅडो योग्य पर्याय आहे (पण मर्यादित प्रमाणात). पण जर रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, त्वचा-केस सुधारायचे असतील आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायचा असेल, तर आवळा सर्वोत्तम आणि स्वस्त उपाय आहे.
डॉ. वत्स्य यांच्या मते,”भारताचे पारंपरिक सुपरफूड जसे की आवळा, हे शतकानुशतकांपासून आपल्या आरोग्याचे रहस्य आहेत.
आता वेळ आली आहे की आपण विदेशी फूड्सच्या मोहातून बाहेर येऊन आपल्या देशी खाद्यपदार्थांच्या खजिन्यांना ओळखावं.”
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा सर्वोत्तम पर्याय आहे. तो फक्त व्हिटॅमिन सी पुरवतो असं नाही, तर तो स्वस्त, नैसर्गिक आणि भारतीय हवामानाला अनुरूप आहे. अॅव्होकॅडोही आरोग्यासाठी चांगला असला तरी, तो लक्झरी हेल्थ फूड आहे — रोजच्या भारतीय डाएटमध्ये आवळ्याची बरोबरी कुणी करू शकत नाही!
