नोव्हेंबरमध्ये ‘या’ ४ राशींवर लक्ष्मीची राहील कृपा, पैसा आणि धान्याची कमतरता नसेल

मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

lifestyle
धनु राशीच्या लोकांना या महिन्यात पैशाची आवक चांगली राहील. (photo: indian express)

नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. तसेच १६ नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत, २० नोव्हेंबरला गुरू कुंभ राशीत आणि २१ नोव्हेंबरला बुध पुन्हा एकदा आपली राशी बदलणार आहेत. या महिन्याच्या १९ तारखेलाही चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या या बदलत्या हालचालीमुळे ४ राशींच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना या महिन्यात लाभाच्या अनेक संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. पैसा येत राहील. व्यवसायातही लाभाच्या संधी खुल्या होतील. भागीदारीच्या कामात लाभ होईल.

वृषभ

वृषभ रास असलेल्या व्यक्तींना करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. माँ लक्ष्मीची विशेष कृपा राहील. त्यात नशीब तुम्हाला खूप साथ देईल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायासाठीही वेळ चांगला आहे. संयमाने काम केल्यास त्याचा लाभ मिळेल. व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. माता लक्ष्मीच्या विशेष कृपेमुळे या महिन्यात धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

धनु

धनु राशीच्या लोकांना या महिन्यात पैशाची आवक चांगली राहील. लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. कामाच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहील. तुम्ही सर्व काही पूर्ण निष्ठेने कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. पगार वाढेल. बँक बॅलन्स वाढवण्यात यश मिळेल. कर्ज फेडता येईल. एकंदरीत नोव्हेंबर महिना आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहील.

मीन

मीन रास असलेल्या व्यक्तींचा नोव्हेंबर महिना प्रगतीचा काळ घेऊन आला आहे. पैशाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत उघडतील. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत, त्यामुळे पैसे कमावण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maa lakshmi will be kind to these 4 zodiac signs in november 2021 there will be no shortage of money and grains scsm

Next Story
जाणून घ्या, FSSAI म्हणजे काय? अन्नपदार्थाविषयीच्या तक्रारी कशा करायच्या, कोणती कारवाई होते
फोटो गॅलरी