Madhuri Dixit Style Kanda Poha: बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित केवळ तिच्या अभिनय आणि नृत्यासाठीच नाही, तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाची ५० वर्षे ओलांडल्यानंतरही, तिच्या तेजस्वी त्वचेचे आणि सुडौल शरीराचे रहस्य म्हणजे तिची निरोगी जीवनशैली आणि आहार. सध्या ती तिच्या ‘मा-बहन’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, शेफ संज्योत कीर यांच्या युअर फुड लॅब या शोमध्ये माधुरी दीक्षित यांनी खुलासा केला की, त्यांचा सर्वात आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ पोहे आहेत.
माधुरी एक खवय्या आहे आणि तिला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ खूप आवडतात. नुकतेच, तिने तिच्या आवडत्या नाश्त्याचे, कांदा पोह्याचे रहस्य सांगितले. पण त्यांची पोहे बनवण्याची पद्धत आपल्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आणि अधिक पौष्टिक आहे. जर तुम्हीही नाश्त्यासाठी एखादा आरोग्यदायी पदार्थ शोधत असाल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहू शकता.
माधुरी दीक्षित यांच्या पोह्यांच्या रेसिपीचं सिक्रेट काय?
- मोड आलेले मुग
माधुरीने सांगितले ती पोह्यांमध्ये मोड आलेले मुग टाकते कारण पोहा हा साधारणपणे कर्बोदकांचा चांगला स्रोत मानला जातोपण माधुरी प्रथिने मिळवण्यासाठी मोड आलेले धान्य वापरते ज्यामुळे ते अधिक पौष्टिक होतात. - शेव
माधुरीला पोह्यामध्ये कधी कधी थोडी शेव टाकायला आवडते जेणेकरून पोहे आणखी चवदार लागतात. - कांद्याचा कुरकुरीतपणा
माधुरीने असेही सांगितले की, तिला बटाटा पोहा नाही कांदे पोहेच आवडतात. कांदा खूप जास्त भाजत नाही कारण तो मऊ होतो. ती कांदा थोडा कुरकुरीत लागेल एवढाच भाजते ज्यामुळे पोह्यांमध्ये एक कांद्याचा कुरकुरीतपणा कायम राहतो.
या गोष्टींमुळे पोह्यांची चव वाढते ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी हा एक उत्तम नाश्ता ठरतो.
माधुरी दीक्षित कसे बनवते खास कांदा पोहे?
साहित्य
- पोहेपोहे: २ कप
- कांदा: १ मोठा (कांदा)
- मोड आलेले मूग: अर्धा कप
- शेंगदाणे: २-३ चमचे
- हिरवी मिरची: २ (बारीक चिरलेली)
- कढीपत्ता: ८-१०
- जिरे मोहरी: १ चमचा
- हळद: अर्धा चमचा
- लिंबाचा रस: १ चमचा
- हिरवी कोथिंबीर: बारीक चिरलेली
- तेल: २ मोठे चमचे
- मीठ: चवीनुसार
- शेव : गरजेनुसार
कांदा पोहे बनवण्याची कृती
सर्वप्रथम पोहे चाळणीत घालून स्वच्छ पाण्याने एक-दोनदा धुवा. नंतर त्यात थोडे मीठ आणि अगदी थोडी साखर घालून ठेवा.
एका कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून बाजूला ठेवा. त्यानंतर, उरलेल्या तेलात मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. तर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता, कारण माधुरीला कुरकुरीत कांदा आवडतो. कांदा परतल्यावर त्यात हळद-मिरची घाला आणि नंतर पोहे आणि तळलेले शेंगदाणे घाला. हे घातल्यानंतर, पोहे मंद आचेवर सुमारे दोन मिनिटे वाफवून घ्या. शेवटी गॅस बंद करा. वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि शेव घालून सर्व्ह करा.
