Maghi Ganesh Jayanti 2025 Wishes : महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु, माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला (Vinayak Chaturthi 2025) श्रीगणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मोत्सव महाराष्ट्रासह अन्य राज्यांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

माघी गणेश जयंतीनिमित्त तुम्ही यंदा प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून सुंदर शुभेच्छा अन् शुभेच्छापत्र पाठवून या सणाचा उत्साह आणखी वाढवू शकता. या सणानिमित्त तुम्ही तुमचे प्रियजन, नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटू शकत नसला तरी तुम्ही त्यांना ऑनलाइन शुभेच्छा नक्की पाठवू शकता. चला तर मग पाहू माघी गणेश जयंतीच्या मंगलमय अशा मराठमोळ्या शुभेच्छा… (Maghi Ganesh Jayanti 2025) 

माघी गणेश जयंती २०२५ मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi

१) माघी गणेश जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!!

२) तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

Maghi ganesh chaturthi 2025 wishes in marathi
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

३) हार फुलांचा घेऊनी, वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे, पूजन करूया गणरायाचे,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

४) तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटाइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान असो,
आयुष्य सोंडेइतके लांब असो,
क्षण मोदकाइतके असो..
माघी गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

५) बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली घरी
संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरुनी,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!

६) सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
माघी गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

७) बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
माघी गणेश जयंतीनिमित्त शुभेच्छा!!

Maghi ganesh chaturthi 2025 wishes in marathi
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

८) गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद
सर्व संकटांचे झाले निवारण, लाभले तुझ्या आशीर्वादाने सर्व काही.
माघी गणेश जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!!

९) सर्व शुभकार्यांत आधी पूजा तुझी,
तुजविण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
माघी गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

१०) अडचणी आहेत खूप आयुष्यात
पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

गणपती बाप्पा कोट्स ( Maghi Ganesh Jayanti Quotes In Marathi)

१) देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची
एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार!

Happy Maghi Ganesh Jayanti 2025 Messages wishes in marathi
माघी गणेश जयंती २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा

२) भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

२) श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठीशी राहावी, हीच प्रार्थना
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

३) तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

४) अवघी सृष्टी करतेय नमन
झाले माझ्या बाप्पाचे आगमन
।। गणपती बाप्पा मोरया।।

५) मोरया मोरया गोड हे नाम तुझे |
कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

Happy Maghi Ganesh Jayanti Messages

माघी गणेश जयंती २०२५ मेसेज, स्टेटस ( Maghi Ganesh Jayanti Status, SMS In Marathi)

१) साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

२) प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

३) मोदकांचा प्रसाद,
लाल फुलांचा हार,
नटून-थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा !

Happy Maghi Ganesh Jayanti 2025 Messages wishes in marathi
माघी गणेश जयंती २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा

४) गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तुज पायी
गणपती बाप्पा मोरया!

Story img Loader