Best Marathi Wishes for Maharashtra Day, Labour Day and Rajbhasha Din: मे महिन्याची सुरुवात म्हणजे उत्साह, अभिमान आणि आपल्या संस्कृतीचा जल्लोष साजरा करण्याची खास वेळ! १ मे हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरतो. एकीकडे महाराष्ट्र दिन, आपल्या राज्याच्या अभिमानाचा दिवस; तर दुसरीकडे कामगार दिन, मेहनती हातांच्या कष्टांना सलाम करण्याचा क्षण आणि याच दिवशी मराठी राजभाषा दिन, आपल्या मायमराठी भाषेच्या गौरवाचा उत्सवही साजरा केला जातो. या तिन्ही दिवसांचा संगम म्हणजे परंपरा, कष्ट आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाफ म्हणावा लागेल.

आजच्या डिजिटल युगात आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धतही बदलली आहे. WhatsApp Status, Facebook Messages, Instagram Stories यांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देतो, आपला अभिमान व्यक्त करतो आणि नात्यांमध्ये आपुलकीची उब वाढवतो, म्हणूनच या खास दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही मराठमोळे, मनाला भिडणारे आणि हटके शुभेच्छा संदेश, जे तुम्ही सहजपणे तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना पाठवू शकता. चला तर मग, या खास दिवसाला आणखी खास बनवूया आणि आपल्या शब्दांमधून व्यक्त करूया महाराष्ट्राबद्दलचा अभिमान! कामगारांप्रती कृतज्ञता आणि मराठी भाषेवरील प्रेम…

महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा!

गड-किल्ले, परंपरा आणि मराठी बाणा,
हीच आपली खरी ओळख आणि ठेवा अनमोल खजिना…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र म्हणजे संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान,
ही ओळख कायम राहो – हीच प्रार्थना!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवरायांची शिकवण, संस्कृतीचा वारसा,
महाराष्ट्र माझा – अभिमानाचा झेंडा उंचच राहो!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…
हीच ओळख, हीच शान
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

मातीचा सुगंध, किल्ल्यांचा अभिमान,
मराठी असण्याचा आहे खास मान…
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मेहनतीला तोड नाही,
तुमच्या कष्टाला मोल नाही…
तुमच्यामुळेच उभा आहे हा देश!
कामगार दिनाच्या शुभेच्छा!

कामगार म्हणजे देशाची खरी ताकद,
त्यांच्या कष्टामुळेच प्रगतीची वाट खुली होते…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्टाला कधीही पर्याय नसतो,
आणि कामगाराशिवाय विकास नाही…
कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सन्मान कामगारांचा,
कारण त्यांच्यामुळेच उभं आहे प्रत्येक स्वप्न!
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या कष्टामुळे जग चालतं,
त्यांच्या योगदानाला मनापासून मानाचा मुजरा…

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जिथे शब्दांना मिळतो संस्कारांचा स्पर्श,
तीच आपली मराठी भाषा – अभिमानाचा गर्व!
राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी ही फक्त भाषा नाही,
ती आपली ओळख, संस्कार आणि अभिमान आहे!
राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!

भाषा जपा, संस्कृती जपा,
मराठीचा अभिमान कायम ठेवा!
राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी बोलूया, मराठी जगूया,
हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख!
राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शब्दांची श्रीमंती, विचारांची ताकद,
मराठी भाषेचा वारसा सदैव जपूया!
राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!