राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) 2021 द्वारे अंडर ग्रॅज्युएट वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीकृत समुपदेशन प्रक्रिया (CAP) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ८५ टक्के राज्य कोट्यातील एमबीबीएस आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे NEET-पात्र उमेदवार समुपदेशन प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते info.mahacet.org/CAP2021/NEET_UG या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

आत्तापर्यंत, महाराष्ट्र NEET समुपदेशन वेळापत्रक आणि अधिसूचना जारी करण्यात आलेले नाही. मात्र, समुपदेशन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी जारी करण्यात आली आहे. याचबरोबर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल (CET), महाराष्ट्र NEET समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. समुपदेशनाच्या माहितीसाठी, उमेदवार वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC), mcc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

महाराष्ट्र NEET समुपदेशन २०२१: आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी नोंदणीच्या वेळी ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे आणि प्रवेश प्रक्रियेदरम्यान मूळ प्रती बाळगणे आवश्यक आहे.

NEET 2021 प्रवेशपत्र

mahacet.org वर भरलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत

NEET ची गुणपत्रिका( मार्कशीट)

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

HSC (वर्ग 12) गुणपत्रिका

वयाच्या पुराव्यासाठी SSC (वर्ग 10) प्रमाणपत्र

आधार कार्ड

अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate)

वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

दुसरीकडे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्र सरकारने जारी केलेले जात प्रमाणपत्र दाखवावे लागेल.