Maharashtra traditional jewellery: सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्न म्हटले की खरेदी सुरू होते. कपड्यांपासून दागिने खरेदी करण्यास सुरूवात होते. यंदा लग्नसमारंभात तुम्हाला हटके दागिने परिधान करायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रीयन दागिन्यांची निवड करू शकता. अनेकांना महाराष्ट्रीयन दागिन्यांविषयी माहिती नाही. महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अनेक प्रकार दिसून येतात आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

१. कोल्हापूरी साज

कोल्हापुरी साज हा महाराष्ट्रीयन महिलांमध्ये अत्यंत प्रचलित असलेला दागिना आहे. हा दागिना लाखेपासून तयार केला जातो. या साजवर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेले असते. हा सहसा १० पानी ते २१ पानी पर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात असतो.

२.बोरमाळ

या दागिन्यामध्ये सोन्याचे मणी असतात. ते मणी लाबगोल आकाराचे असतात. ही लहान बोराच्या आकाराच्या मण्यांची माळ म्हणून याला बोरमाळ म्हणतात.

३. जोंधळेमनी

जोंधळे म्हणजे धान्य. ही पोत सुद्धा धान्यांप्रमाणे छोट्या छोट्या मण्यांपासून तयार केली जाते. हा दागिना तीन पदरीपासून ते दहा पदरी पर्यंत मिळतो.

४. कोल्हापूरी मंगळसूत्र

कोल्हापूरी मंगळसूत्र हे कोल्हापूरच्या संस्कृतीचा भाग आहे. कोल्हापूरी साजमध्ये या मंगळसूत्राला खूप महत्त्व आहे.

६. चित्तांग

चित्तांग हा प्राचीन संस्कृती जपणारा दागिना आहे. हा कर्नाटकातील दागिना आहे. लहान मुलांच्या मनगटात बिंदल्या घालतात त्याच बिंदल्याच्या आकाराचा हा दागिना असतो.

७. पुतळीहार

पुतळीहार हा एक पारंपारिक दागिन असून यावर देवी लक्ष्मी किंवा राम सीता यांचे कोरीव काम असते.

८. तन्मणी, चिंचपेटी

तन्मणी, चिंचपेटी हे मोत्यांचे दागिने आहेत. सणासुदीला महिला आवडीने मोत्यांचे दागिने घालतात.

९. बेलपान ठुशी

महादेवाला वाहणाऱ्या बेलपान सारखा हा दागिना दिसून येतो. या दागिन्याला बेलपानाच्या आकाराची पेटी असते आणि त्या प्रत्येक पेटीला खालील लोलक असतात. हा दागिना अंगावर अगदी उठून दिसतो.

१०. बकुळीहार

बकुळीहारामध्ये बकुळीच्या फुलाप्रमाणे दिसणारे बीड्स एकमेकांना जोडून असतात. हा आकाराने लहानही असतो आणि लांबही असतो. महाराष्ट्रीयन वधू आवडीने लग्न समारंभात बकुळीहार परिधान करतात.

११. मोहनमाळ

हा मराठमोळा दागिना अत्यंत कमी किंमतीत आणि तितकाच आकर्षक दिसतो. विशेषत: दिवाळीत महिला मोहन माळ परिधान करतात.

१२. तोडे

तोडेमध्ये अनेक प्रकार आहेत. मोत्यांचे तोडे, गहू तोडे, शिंदेशाही तोडे इत्यादी. विशेषत: लग्नसमारंभात वधूला तोडे घालण्याची परंपरा आहे.

१३. वज्रटीक

हा कोल्हापूरी प्रसिद्ध दागिना आहे. यामध्ये सोन्याची तार आणि रेशमी धागा वापरला जातो. या दागिन्याला कोल्हापूरचया महालक्ष्मी मंदिराचा इतिहास आहे. त्यामुळे या दागिन्याला महालक्ष्मी गादी ठुशी या नावाने सुद्धा ओळखला जातो.

१४. पोहेहार

पोह्यांप्रमाणे दिसणार पोहेहार हा अतिशय नाजूक असा दागिना आहे. हा दागिना वजनाला अतिशय हलका आणि दिसायला सुरेख असतो.

Story img Loader