आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं असत. त्यासाठी त्या बाजारातील अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतात. चेहऱ्यावरील प्रत्येक अवयव नीट सजवल्याने सौंदर्य खुलून जातं. त्यामधील सुंदर आणि तेजस्वी डोळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. यामुळेच सर्व महिला मेकअप करताना डोळे सजवायला कधीही विसरत नाहीत. स्त्रिया डोळ्याचा मेकअप करताना बाजार आधारित मस्करा, आयलायनर आणि आयशॅडो वापरतात. मात्र, यांची किंमत महाग असते. त्यामुळे तुम्ही काही सोप्या पद्धतींच्या मदतीने घरच्या घरी आयलायनर तयार करू शकता आणि त्यावर तुम्हाला जास्त खर्चही होणार नाही.

महिला डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी अनेक प्रसिद्ध ब्रँडची उत्पादने वापरताना दिसतात. मात्र, डोळ्यांच्या नाजूक त्वचेवर केमिकलयुक्त मेकअपचा वापर केल्यास डोळ्यांना हानी पोहचू शकते. त्यासाठी आम्ही तुम्हाला नैसर्गिक गोष्टींनी घरच्याघरी आयलायनर बनवण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य वाढवू शकता तसेच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

( हे ही वाचा: आंघोळीनंतरही शरीराचे ‘हे’ पाच भाग राहतात अस्वच्छ; दुर्लक्ष केल्यास होईल मोठा अपाय)

घरच्या घरी आयलायनर बनवण्यासाठी फिकट रंगद्रव्य किंवा आय शॅडो, आयलायनर ब्रश, प्रायमर, कापूस आणि पाणी घ्या. आता आयलायनर कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

आयशॅडो पावडर घ्या

आयलायनर बनवण्यासाठी तुमच्या आवडत्या शेडची आयशॅडो पावडर निवडा. जर तुम्हाला ग्लिटर आयलायनर बनवायचे असेल तर ते बनवण्यासाठी पावडर आय शॅडो वापरणे चांगले. तसेच मॅट फिनिशिंगसाठी मॅट आयलायनर वापरा. तसंच जर तुमच्याकडे आय शॅडो नसेल तर तुम्ही ब्लश, हाय लायटर पावडर किंवा लूज पिगमेंटचा देखील वापर करू शकता.

कंटेनर वापरा

आयलायनर सुरक्षित ठेवण्यासाठी कंटेनर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात आय शॅडो घाला आणि त्यात काही थेंब पाणी मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाण्याऐवजी रिफ्रेशिंग आय ड्रॉप्सचा देखील वापर करू शकता.

( हे ही वाचा: Drinking Water: जेवताना पाणी प्यायल्याने आरोग्यास होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या ते कसे टाळावे)

चांगले मिसळा

आयलायनर चांगले मिसळण्यासाठी धारदार आणि पातळ आयलायनर ब्रशचा वापर करा. याने आयलायनर चांगले मिसळले जाईल. त्यानंतर आयलायनरमध्ये पाणी घाला आणि ब्रशच्या मदतीने चांगले मिसळून घ्या. हे तुमच्या आयलायनरला स्थिरता देईल.

प्रायमर घाला

आयलायनर मिक्स केल्यानंतर त्यात आय प्राइमर किंवा तुम्हाला हवं असल्यास फेस प्राइमर घालू शकता. यामुळे तुमचे आयलायनर जास्त काळ खराब होणार नाही आणि तुम्ही त्याचा वापर दीर्घकाळ करू शकता.

( हे ही वाचा: Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या)

कंटेनर मध्ये साठवून ठेवा

आयलायनर बनवल्यानंतर ते नीट डब्यात भरा. यानंतर तुम्ही हा आयलायनर वापरू शकता. याद्वारे तुम्ही केवळ रंगीबेरंगी आयलायनरच तयार करू शकत नाही, तर जे जुने आयशॅडो असतील ते खराब होण्याआधी त्याचे सुंदर आयलायनर देखील तुम्ही बनवू शकता.