Make Healthy Ladu: लग्न समारंभ असो किंवा कोणताही सण अनेक घरांमध्ये विविध प्रकारचे लाडू आवर्जून बनवले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी अशा लाडूंची रेसिपी घेऊन आलो आहोत, जे खाण्यास खूप चविष्ट तर असतातच; पण ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, थकवा दूर होतो. तसेच शरीराला ऊर्जा मिळते.
थकवा दूर करणारे लाडू
- २०० ग्रॅम देशी तूप
- १०० ग्रॅम बारीक रवा
- १०० ग्रॅम गूळ
- १५० ग्रॅम गव्हाचे पीठ
- ७-८ चमचे दूध
- १/४ कप टरबुजाच्या बिया
- ८-१० मनुके
- २ चमचे वेलची पूड
लाडू बनवण्याची रेसिपी
- कमकुवत शरीराला बळकट बनविण्यासाठी तुम्ही देशी तुपाचे लाडू बनवू शकता. ते बनविण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तूप टाकून रवा भाजून घ्या. त्यातून हलका सुगंध येईपर्यंत रवा परता.
- नंतर त्यात गव्हाचे पीठ घालून तेदेखील काही वेळ परतून घ्या. नंतर त्यात २-३ चमचे देशी तूप घालून बारीक केलेला गूळ मिसळून घ्या.
- या मिश्रणाचा छान सुगंध येईपर्यंत तुम्ही हे परतून घ्या. नंतर गॅस बंद करा.
- त्यानंतर त्यात दूध मिसळून पुन्हा गॅस चालू करा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत परतत राहा.
- शेवटी त्यात वेलची पूड, ड्राय फ्रुट्स व टरबृुजाच्या बिया टाकून, त्याचे लाडू वळून घ्या.