उपवास केल्याने आपल्या पोटातील आतड्यांना एक प्रकारे विश्रांति मिळते. तसेच उपवास म्हणजे शरीराला शुद्ध करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. पण प्रत्येकाला उपवास करणे जमतं नाही. नवरात्रीच्या या उपवासाच्या दिवसात तुम्हाला जरा चायनीज खाण्याचे मन करत असेल, तर तुम्ही घरच्या घरी बाजरीचे ग्लुटेन-फ्री नूडल्स बनवून तुमच्या आहारात समावेश करू शकतात. कारण प्रक्रिया केलेल्या आणि पॅक केलेल्या सॉस ऐवजी, निरोगी आणि सात्विक पद्धतीने सॉस तयार करण्याचे बरेच मार्ग आहेत.चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी चायनीज सॉस बनवण्याची पद्धत.

नवरात्र उपवास म्हंटल फक्त बटाटे आणि साबुदाणा यांचे पदार्थ बनवून खाणे असे नाही. किंवा कुट्टूचे पकोडे बनवणे आणि गोड पुडिंग्स असे पदार्थ खाणे एवढेच पर्याय आहेत असे देखील नाही. तुम्ही या उपवासात ऑइल फ्री कबाब, स्वादिष्ट स्नॅक्स, तसेच काही तुम्हाला आवडणारे भोपळा, अननस, वॉटर चेस्टनट आणि अधिक सारख्या सुपरफूडपासून बनवलेले डिप्स, सॉस यापासून अनेक डिश बनवून खाऊ शकतात.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

यावेळी क्रेजी कडची मिल्ट कोचच्या संस्थापक शालिनी रजनी यांनी इंस्टाग्रामवर चायनीज सॉस बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे. यात त्यांनी तुम्हाला जर सॉस बनवण्याचे पर्याय माहीत नसतील, तर तुम्ही ह्या झटपट आणि सात्विक पद्धतीने सॉस बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयता रेसिपी

ग्रीन चिली सॉस

साहित्य

१ कप पुदिन्याची पाने

दोन आवळे आवश्यकतेनुसार

२-३ हिरव्या मिरच्या

२ इंच आले

१ टीस्पून डाळिंबाच्या दाण्यांची पावडर

चवीनुसार मीठ

आवश्यकतेनुसार पाणी

कृती

पुदिन्याची पाने पूर्णपणे स्वच्छ पाण्यात धुवा. यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र ब्लेंडर जारमध्ये बारीक करा.

या पेस्ट मध्ये नंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला.

आता चांगले ३० सेकंद ब्लेंड करा.

अशारीतीने सात्विक ग्रीन चिली सॉस तयार आहे.

डार्क सॉस

साहित्य

१/२ कप गूळ

१/४ कप पाणी

२ टेस्पून आले जुलिअन्स

१ टीस्पून नारळ अमीनो

१ टीस्पून शेंगदाणे तेल

१ टीस्पून लाल तिखट

कृती

एका कढईत तेल गरम करून त्यात २ टेस्पून आले ज्युलियन्स घाला. यानंतर यात गूळ, पाणी, तिखट आणि नारळ अमीनो घाला. आता हे मिश्रण ३-४ मिनिट चांगले हाय फ्लेम वर शिजवा. ३-४ मिनिट झाल्यानंतर फ्लेम बंद करा. आता या मिश्रणात चवीनुसार मीठ टाका.

आता तुम्ही नूडल्स अॅड करताना वरील सॉस थंड होऊ द्या.