scorecardresearch

Premium

कोरफडीसह ‘हे’ पदार्थ मिसळून बनवा घरगुती तेल, केसांची गळती कमी होऊन दाटपणा वाढेल; पाहा ही रेसिपी

केस गळणे, पातळ होणे यांसारख्या समस्यांसाठी किंवा केसांची निगा राखण्यासाठी घरातील दररोजच्या वापरातील काही पदार्थांचा उपयोग करून हे तेल बनवून पाहा.

homemade aloe vera hair oil recipe
केस घनदाट होण्यासाठी घरी बनवा कोरफडीचे तेल. [photo credit – freepik]

आपले केस लांब, घनदाट आणि चमकदार असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, अयोग्य आहारामुळे म्हणा, केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे किंवा सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या त्रासाने केस गळण्याच्या समस्येचा सामना बहुतेकांना करावा लागत आहे. यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारची तेलं, हेअर मास्कसारखी उत्पादने उपलब्ध असतात. परंतु, अशी उत्पादने सगळ्यांना परवडण्यासारखी असतीलच असे नाही. अशावेळी जर घरात असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारे आणि कोणतेही रासायनिक घटक नसणारे तेल बनवता आले तर केसांच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरू शकते. नाही का?

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @samasya_and_samadhan या अकाउंटने कोरफडीच्या तेलाच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवलेले सर्व पदार्थ आपल्या घरात आधीपासूनच असतात; त्यामुळे या तेलाची रेसिपी काय आहे ते पाहा.

how to make kajal at home hack
Beauty tips : तूप, बदाम अन्….; काय आहे घरगुती काजळ बनवण्याची पारंपरिक ट्रिक, जाणून घ्या
Watching TV While Eating
जेवताना टीव्ही पाहता का? लगेच थांबवा; तज्ज्ञांनी सांगितलेले दुष्परिणाम जाणून घ्या
Problem Solved Can Spicy Food Trigger Pimples Acne On Skin Experts Suggest How Spices Help To Get Clean Skin Diet Plan
तिखट पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्स, पुरळ वाढतात की होते मदत? तज्ज्ञांनी सोडवला मोठा प्रश्न, लक्षात घ्या की..
Uric Acid Removal Food
रक्तातील खराब युरिक अ‍ॅसिड झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ पाच पदार्थ; डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत

केसांसाठी कोरफडीचे घरगुती तेल कसे बनवावे पाहा

साहित्य

कांदा
कढीपत्ता
कोरफड
काळी मिरी
मेथीचे दाणे
खोबरेल तेल

हेही वाचा : केवळ ‘१० रुपयांमध्ये’ घालवा पायाचा काळपटपणा! या ‘दोन’ गोष्टी वापरून घरीच करा पार्लरसारखे पेडिक्युअर

कृती

सर्वप्रथम कोरफडीची पाने व्यवस्थित धुवून पानाच्या बाजूला असणारे काटे काढून, कोरफडीचे छोटे छोटे तुकडे करून बाऊलमध्ये ठेवावे. त्यानंतर त्याच बाऊलमध्ये कांद्याचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने घालावी.
हे सर्व पदार्थ मिक्सरमधूून वाटून घ्यावे.
आता गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये खोबरेल तेल घालून तयार केलेले कोरफड, कांदा आणि कढीपत्त्याचे मिश्रण घालून घ्यावे. हे सर्व मिश्रण सतत ढवळत राहून शिजवून घ्यावे. आता या मिश्रणाला बुडबुडे येऊ लागले की त्यामध्ये काळी मिरी आणि मेथीचे दाणे घालावे.
काही मिनिटांसाठी मंद गॅसवर हे तेल ढवळत राहून नंतर कढईखालील गॅस बंद करावा.
आता काचेच्या बरणीवर एक कापड ठेवून, त्यामधून हे तेल गाळून घेऊन बरणीत भरून घ्यावे.
केसांना घनदाट बनवणारे कोरफडीचे तेल तयार आहे.

तेल बनवून तर तयार आहे, परंतु याचा वापर कसा करायचा तेसुद्धा पाहा.

कोरफडीचे तेल कसे वापरावे?

आठवड्यातून तीन दिवस हे तेल आपल्या केसांच्या मुळांना लावून छान मसाज करावा. तेलाचा सांगितल्याप्रमाणे नियमित वापर केल्यास, तीन महिन्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आठवड्यातून तीन दिवस हे तेल केसांना लावल्यास केसांची गळती कमी होईल, केस तुटण्यासारखी समस्या कमी होऊन नवीन केस उगवण्यास मदत होऊ शकते.

इन्स्टाग्रामवरून @samasya_and_samadhan या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओमधून ही रेसिपी दाखवली असून, यातील कोणत्याही पदार्थाचा तुम्हाला त्रास/ ॲलर्जी असल्यास याचा वापर करू नये, असा सल्लादेखील दिलेला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make this amazing aloe vera hair oil for hair growth and thickness use this simple recipe dha

First published on: 03-12-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×