scorecardresearch

४८ वर्षीय मलायकाच्या रुटीनमध्ये ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक आहे खास; परफेक्ट बॉडीसाठी ठरू शकतो रामबाण उपाय

Malaika Arora Special Detox Drink: मलायकाच्या मते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एक ड्रिंक तिला खूप मदत करत आले आहे.

४८ वर्षीय मलायकाच्या रुटीनमध्ये ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक आहे खास; परफेक्ट बॉडीसाठी ठरू शकतो रामबाण उपाय
मलायकाच्या रुटीनमध्ये 'हे' डिटॉक्स ड्रिंक आहे खास (फोटो: इंस्टाग्राम)

Malaika Arora Jeera Water for Health: मलायका अरोरा हिने वयाच्या ४८ व्या वर्षी सुद्धा स्वतःच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेळोवेळी मलायका आपल्या फिटनेसचे श्रेय योगा व डाएटला देत असते. इतकंच नव्हे तर आपल्या अनेक डाएट टिप्स तिने फॅन्ससह शेअर केल्या आहेत. यातीलच एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे सकाळी उठल्यावर मलायका कुठले पेय घेणे पसंत करते. मलायकाच्या मते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एक ड्रिंक तिला खूप मदत करत आले आहे.

मलायकाचा दिवस कसा असतो?

मलायका म्हणते की जर आपल्याला खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर त्याचा परिणाम मानसिक व शारीरिक दोन्ही बाजूंनी दिसतो. यासाठी मन व शरीर वेळोवेळी डिटॉक्स करणे गरजेचेच आहे. यासाठी सकाळी जिरे- ओवा व मेथीचे एक खास डिटॉक्स ड्रिंक न चुकता घेणे फायद्याचे ठरू शकते. यासह दिवसभरातुन थोडा वेळ काढून व्यायाम करणे सुद्धा महत्त्वाचे आहे असे तिने सांगितले.

मलायकाने जिरे- ओवा व मेथीच्या पाण्याचा ग्लास हातात धरून एक फोटो शेअर केला होता यामध्ये तुम्ही मेथीचे दाणे, ओवा व जिऱ्याचे दाणे स्पष्ट पाहू शकता. वजन कमी करणे, पाचन व ब्लड शुगर नियंत्रणासाठी हे ड्रिंक उपयोगी ठरू शकते. माझ्या दिवसाची सुरुवात मी या पाण्याने करते असे सांगत मलायकाने हा फोटो शेअर केला होता.

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

डिटॉक्स ड्रिंक कसे तयार कराल?

एका ग्लास मेथीचे दाणे, जिरे व ओवा रात्रभर भिजवून ठेवा. हेच पाणी सकाळी उठून प्यावे. शक्य असल्यास हे पाणी थोडे उकळूनही पिऊ शकता. या पाण्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन वाढून मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पोटात जमलेला गॅस सुद्धा निघून जाण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 17:36 IST

संबंधित बातम्या