Malaika Arora’s 10-Minute Chinese Exercise To Burn Body Fat : जेव्हा जेव्हा बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींची चर्चा होते, तेव्हा मलायका अरोराचे नाव नेहमीच प्रथम येते. मलायका अरोरा जरी ५२ वर्षांची असली, तरी फिटनेससमोर ३१ वर्षांच्या अभिनेत्रीही फिक्या पडतात. तिच्या फिटनेसचे सिक्रेट म्हणजे तिची रुटीन आणि डाएट. आजकाल सर्वांना मलायकासारखी फिगर हवी असते. यासाठी लोक जिममध्ये जातात आणि कडक डाएट रूटीन फॉलो करतात, पण तरीही फरक जाणवत नाही.
जर तुम्हालाही मलायकासारखा फिटनेस हवा असेल, तर अभिनेत्रीने अलीकडेच एक व्यायामाचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो फॉलो करून तुम्ही कमी वेळात पोटाची चरबी कमी करून स्लिम बॉडी बनवू शकता. चला तिच्या या व्यायामाबद्दल अधिक जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी मलायका अरोराचा १० मिनिटांचा व्यायाम
मलायका अरोरा म्हणते की, वजन कमी करण्यासाठी जिममध्ये अनेक तास व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही खालील १० मिनिटांच्या चिनी व्यायाम प्रकारानेदेखील वजन कमी करू शकता. या व्हिडीओमध्ये ती १० मिनिटांच्या Tai Chi या व्यायाम प्रकाराविषयी सांगताना दिसतेय, ज्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि शरीराला एक चांगला आकार मिळतो.
१) शोल्डर ट्विस्ट आणि ओपनिंग मूव्हमेंट
१) प्रथम सरळ उभे राहा. तुमची मान हळूहळू उजवीकडे आणि नंतर डावीकडे वाकवा.
२) तुमचे खांदे पुढे-मागे गोल-गोल फिरवा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा.
यामुळे मान आणि खांद्यांमधील जडपणा कमी होतो, जास्त वेळ बसल्यामुळे होणारा जडपणा कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
२) स्टँडिंग स्पाइनल ट्विस्ट
१) पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. हात सैल सोडा, कंबरेपासून गोल-गोल अशा पद्धतीने तुमचे शरीर हळूहळू फिरवा.
यामुळे मणक्याची लवचिकता वाढते, पोटाच्या भागात सौम्य हालचाल होते आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
३) आर्म फ्लॅपिंग आणि शोल्डर लिफ्ट
१) प्रथम दोन्ही हात समोरून वर उचला, सैल सोडा आणि हळूहळू खाली आणा. अशाप्रकारे खांद्याचीही हालचाल होते, यामुळे थकवा कमी होतो आणि अतिरिक्त चरबीदेखील कमी होते.
४) टॉर्सो बेंड आणि स्ट्रेच
१) हा व्यायाम प्रकार करण्यासाठी प्रथम शरीराला हळूहळू पुढे वाकवा. नंतर मागे थोडा ताण द्या.
२) यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूलाही वाकवा.
प्रत्येकवेळी दीर्घ श्वास घ्या.
हे कंबर आणि छातीभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करते, शरीराची स्थिती सुधारते आणि पोटाची चरबी कमी करण्यासदेखील मदत करते.
५) लेग स्ट्रेच
१) एक पाय पुढे करा, दुसरा मागे
आता तुमचा पुढचा गुडघा थोडासा वाकवा आणि काही सेकंदात सरळ करा,
२) आता दुसरा पाय पुढे करा आणि त्याच पद्धतीने गुडघा पुढे वाकवा आणि सरळा व्हा.
तुम्ही बाजूंना हलके स्ट्रेचिंगदेखील करू शकता.
यामुळे पायांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि स्नायूदेखील मजबूत होतात.
६) जंपिंग
शेवटी जंप करा. यासाठी शरीर पूर्ण सैल सोडा आणि पायांच्या टाचांवर आणि पायाच्या बोटांवर लहान उड्या मारा. असे केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अतिरिक्त चरबीदेखील कमी होते.
जर तुम्हालाही मलायका अरोरासारखी स्लिम बॉडी हवी असेल तर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये हा १० मिनिटांचा व्यायाम प्रकार समाविष्ट करू शकता.
