तुम्हाला तुमच्या वर्कआउट रुटीनचा कंटाळा आला आहे आणि तुम्हाला असे वाटते की तुमचा वर्कआउटचा कार्यक्रम बिघडला आहे? असे असल्यास, तर कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून तेच करत आहात.अशा प्रकारे, तुम्ही वर्कआउटमध्ये वेगवेगळ्या व्यायामाचा समावेश केल्याने तुम्हाला तुमची फिटनेसची उद्दिष्टे अधिक चांगल्या प्रकारे साध्य करण्यात मदत होईल आणि त्याच वेळी, कंटाळवाणेपणा टाळता येईल.

अलीकडेच अभिनेत्री मंदिरा बेदी हिने तिच्या दिनचर्येत काही वर्कआउट मध्ये काही गोष्टींचा समावेश केला आहे. दरम्यान या अभिनेत्रीने सांगितले की व्यायामात विविधता असणे खूप फायदेशीर ठरते, तेव्हा घरी कसरत कशी सोपी होऊ शकते हे अभिनेत्री मंदिरा बेदीने यावेळी सांगितले आहे.

यावेळी इंस्टाग्रामवर अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी वर्कआउटबद्दलची पोस्ट शेअर केला आहे. यावेळी त्यांनी #workfromhome आणि नंतर #workoutfromhome असे कॅप्शन लिहिले, आणि जेव्हा तुमच्याकडे व्यायामाचे अधिक प्रकार असतात. व त्या गोष्टी थोड्या प्रमाणात तुमच्या वर्कआउटमध्ये समावेश केल्यास एक उत्तम कसरत मिळते आणि यातून पुढे जात असताना माझ्या प्रगतीचे निरीक्षण करत राहते!” असे त्यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली.

फिटनेस रूटीनमध्ये विविधता का आवश्यक आहे?

यासाठी तुम्ही इनडोअर सायकलिंग, किंवा एरोबिक सायकलिंग, एक एरोबिक असा व्यायामचे प्रकार तुम्ही तुमच्या वर्कआउट मध्ये समावेश करू शकतात. यामुळे तुमच्या शरीरातील सहनशक्ती, सामर्थ्य, अंतराल, उच्च तीव्रता आणि पुनर्प्राप्तीवर जोर देते. तर यावेळी डॉ ऋचा कुलकर्णी, किनेसिस- स्पोर्ट्स रिहॅब अँड फिजिओथेरपी क्लिनिक, पुणे येथील मुख्य सल्लागार फिजिओथेरपिस्ट यांच्या मते, व्यायामची तीव्रता, कालावधी आणि वेळेनुसार एरोबिक आणि सामर्थ्य प्रशिक्षणाच्या संतुलित पथ्येची शिफारस करण्यात आली आहे.


याच बरोबर व्यक्तीचे वय आणि आरोग्य यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून तसेच लवचिकता व्यायामासह एरोबिक आणि सामर्थ्य प्रशिक्षणाचे हे संतुलन तुमच्या शरीरासाठी चांगले मिश्रण बनवते. तसेच व्यायाम प्रकारातील तीव्रता, कालावधी आणि त्यात या संदर्भात तुमची वर्कआउट्स ऑप्टिमाइझ करण्यात मोठी भूमिका बजावतात.

विविधता कशी जोडायची?

योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यायामाचा कालावधी वाढवू शकता.

व्यायाम दरम्यान विश्रांती कमी करा.

तुमच्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी तुम्ही केटलबेल, मेडिसिन बॉल इत्यादींचा वापर करून रेझिस्टन्स वर्कआउट्स वाढवू शकतात.

व्यायाम करताना गती कमी करा किंवा गती वाढवा.

एका दिवशी उच्च तीव्रतेचा कसरत करून पहा आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण शरीर टोनिंग करा.