Mars Transit 2021 : मेष-वृश्चिक राशीचा स्वामी मंगळाचं राशी परिवर्तन; कोणत्या राशीच्या लोकांना होऊ शकतो फायदा ?

५ डिसेंबर रोजी मंगळ स्वतःच्या राशीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, जो ४ जानेवारी २०२२ पर्यंत या राशीत असेल. मंगळाचे हे भ्रमण काही लोकांसाठी फायदेशीर तर काहींसाठी त्रासदायक ठरेल. जाणून घ्या सविस्तर…

mangal-rashi-parivartan-2021

Mangal Rashi Parivartan December 2021: मंगळाचा शुभ प्रभाव व्यक्तीला धैर्यवान आणि आत्मविश्वास वाढवतो. कुंडलीत या ग्रहाची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते. ५ डिसेंबर रोजी मंगळ स्वतःच्या राशीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, जो ४ जानेवारी २०२२ पर्यंत या राशीत असेल. मंगळाचे हे भ्रमण काही लोकांसाठी फायदेशीर तर काहींसाठी त्रासदायक ठरेल. येथे तुम्हाला कळेल की कोणत्या ४ राशींना या राशी परिवर्तनाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

सिंह : या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी बदल शुभ दिसत आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप प्रगती दिसून येईल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. प्रवासातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. हे राशी परिवर्तन तुमच्या प्रेम जीवनासाठीही उत्तम ठरेल.

कन्या : या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन चांगले राहील. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली लोकांशी भेट होऊ शकते. व्यवसायात प्रगती होईल. नवीन योजनांचा लाभ मिळेल. आणखी काम होईल.

आणखी वाचा : Solar Eclipse 2021 : 2021 चे शेवटचे सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?

कुंभ : या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी बदल चांगले राहील. उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

आणखी वाचा : New Rules from Today : आजपासून सर्वसामान्यांशी संबंधित ‘या’ पाच गोष्टींमध्ये झाला आहे बदल….

मीन : या राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन लाभदायक ठरेल. करिअरमध्ये प्रगती होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त केलेल्या प्रवासातून पैसे मिळू शकतात. कामाच्या दृष्टीकोनातून हे संक्रमण शुभ राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mangal rashi parivartan 2021 aries and scorpio zodiac planet mars change their zodiac soon prp

Next Story
CBSE XII: पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे तपशील आणि मार्गदर्शक सूचना
फोटो गॅलरी