२२ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब उजळणार

२२ ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत संक्रमण होईल, जे अनेक राशींसाठी चांगलं मानलं जातं. नव ग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला खूप क्रुर मानलं जातं आणि ग्रहाचा सेनापती देखील म्हटलं जातं. या परिवर्तनाने काही ठराविक राशींच्या लोकांचं नशीब उजळणार आहे. नेमक्या कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…

mars-transit-2021

२२ ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत संक्रमण होईल, जे अनेक राशींसाठी चांगलं मानलं जातं. नव ग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला खूप क्रुर मानलं जातं आणि ग्रहाचा सेनापती देखील म्हटलं जातं. जेव्हा मंगळाच्या स्थानात बदल होतो तेव्हा ज्योतिषविश्वात बरेच मोठे बदल होतात. या बदलामुळे संपूर्ण जगाला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. त्याच वेळी, त्याचा सर्व राशींवर देखील खोल परिणाम होतो. २२ ऑक्टोबर रोजी, मंगळ तूळ राशीत विराजमान होणार आहे आणि ५ डिसेंबरपर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. या परिवर्तनाने काही ठराविक राशींच्या लोकांचं नशीब उजळणार आहे. नेमक्या कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…

वृषभ राशीच्या लोकांवर बदलाचा प्रभाव : मंगळ राशीतील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांची खोळंबलेली कामे सुद्धा मार्गी लागतील आणि नोकरीत प्रगती होईल. व्यवसायातही नफा होईल. व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ शकतो. ज्यांना नोकरी नाही, त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.

मेष राशीसाठी नवीन संधींची दारे उघडणार : २२ ऑक्टोबरपासून मेष राशीच्या लोकांसाठीही शुभ काळ सुरू होणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या नवीन संधी मिळतील आणि नवीन नातेसंबंधही मजबूत होतील. तूळ राशीत मंगळ ग्रहाच्या संचार दरम्यान, तुम्ही उत्साही राहाल आणि प्रत्येकजण तुमच्या कामाने सगळेच जण आनंदी राहतील.

कुंभ राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल: कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळाचं संक्रमण शुभ मानलं जातं. या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते. तुमच्यावरील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतः यश मिळवू शकाल.

सिंह राशीच्या लोकांना मिळकत मिळेल: सिंह राशीच्या लोकांना या काळात पूर्वजांची मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम मिळेल. तथापि, हे लक्षात ठेवा की कोणत्याही अनावश्यक वादात अडकू नका, नुकसान होऊ शकते.

या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे: मंगळाच्या संचारमुळे वृश्चिक, कन्या, मीन राशीच्या लोकांना हानी पोहचू शकते, म्हणून सावध राहा. मेहनत करा आणि कोणाशी अनावश्यक भांडण करू नका.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mangal rashi parivartan october 2021 know which rashis will get benefit from mangal rashi parivartan 22 october prp

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!