scorecardresearch

Marathi Bhasha Din 2023: ‘या’ १० मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून मराठी भाषा दिन करा साजरा

या शुभेच्छा शेअर करुन तुम्ही मातृभाषेचा गौरव साजरा करु शकता.

marathi bhasha din 2023
मराठी भाषा दिन २०२३ (संग्रहित)

महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, सन्मानासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याचा हा गौरव दिवस आहे. मराठी भाषा अनेकांसाठी नेहमी कुतूहलाचा विषय आहे. ही भाषा तुम्ही वापरता तसं तिचं सौंदर्य खुलत जाते.

यामुळे मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आज आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवल्या पाहिजे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रामच्या माध्यमातून या शुभेच्छा पाठवत मराठी भाषेचा गौरव साजरा करा. यासाठी आम्ही तुम्हाला १० मराठमोळ्या शुभेच्छा सुचवत आहे. वाचा या शुभेच्छा…

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी राजभाष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रुजवू मराठी फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी दिनाच्या शुभेच्छा

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा,
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मराठी ही आपली मातृभाषा आहे, तिच्या सन्मानासाठी, संवर्धनासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तिथे मराठी भाषेचा वापर करा. तसेच आजच्या दिवशी तुम्ही या शुभेच्छा शेअर करुन मातृभाषेचा गौरव सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 15:30 IST