Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes : माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके,ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती अन् साहित्याचा हा गौरव दिन आहे.
यानिमित्ताने तुम्ही मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवू शकता. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या माध्यमातून शुभेच्छांसह HD Image, Greeting पाठवत मराठी भाषेचा गौरव साजरा करू शकता. (Marathi Bhasha Din 2026 Wishes, Messages, Quotes, Status Greetings in Marathi)
मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Marathi Bhasha Gaurav Din Wishes In Marathi
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझा शब्द माझे विचार, माझा श्वास माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी
अमृतातेही पैजासी जिंके,
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

मराठी भाषा, मराठी मन,
अभिमान महाराष्ट्राचा,
स्वाभिमान मराठीचा…!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळ
मराठी भाषा आहेच अशी रसाळ
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा |Makar Marathi Bhasha Gaurav Din Quotes In Marathi
जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळ
मराठी भाषा आहेच अशी रसाळ
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी म्हणजे गोडवा,
मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी,
मराठी म्हणजे महाराष्ट्र,
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लोकसत्ता.कॉमतर्फे वाचकांनाही मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

