scorecardresearch

Premium

मराठी भाषेत शुद्ध बोलायचंय? जीभ वळवण्यासाठी ‘ही’ ९ वाक्य नेहमी म्हणून पाहा

Marathi Tongue Twisters: बोलताना जीभ वळत नाही असा त्रास असेल तर आपण खालील काही मजेशीर वाक्य (ज्यांना इंग्रजीत Tongue Twisters असं म्हंटल जातं) नक्की म्हणून बघा.

Marathi Language Tongue Twisters That will Help You Learn And Speak Proper Marathi Check Mantra

Marathi Tongue Twisters: आपल्यापैकी अनेकजण मराठी शाळेतून शिकले असतील. आपला जन्म अगदी १९९५ नंतर झाला नसेल तर फार फार सेमीइंग्लिश माध्यमातून आपलं शिक्षण झालं असेल. पण मुळात मराठी हे आपल्या शिक्षणाचे किंबहुना नेहमीच्या संभाषणाचे माध्यम असूनही अनेकांना शुद्ध बोलणं जमत नाही. काही मंडळी तर, हो तेच ते असं म्हणून आपलं अज्ञान लपवतात पण काहींना खरोखरच आपलं भाषा कौशल्य वाढवण्याची इच्छा असते. मराठीत संभाषण म्हणजेच फक्त जाडजूड शब्द वापरणे नव्हे पण अगदी साध्या शब्दांनाही शुद्ध उच्चारता यायला हवं. बोलीभाषेचा अपमान न करता आज आपण मराठी भाषेत किंबहुना प्रमाण मराठी भाषेत कसे बोलता येईल यासाठी एक छोटा आणि मजेशीर खेळ खेळणार आहोत.

मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की यात आपल्या प्रत्येक समस्येसाठी उपाय आहे. तुम्हाला शब्द माहीत आहेत पण बोलताना जीभ वळत नाही असा त्रास असेल तर आपण खालील काही मजेशीर वाक्य (ज्यांना इंग्रजीत Tongue Twisters असं म्हंटल जातं) नक्की म्हणून बघा. कच्चा पापड पक्का पापड पेक्षा एक पायरी वरची ही भाषेची परीक्षा घ्यायला तयार आहात ना? चला तर मग..

maratha community marathi news, economically backward marathi news
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Pm narendra modi Amit Shah Yogi Adityanath Nitin Gadkari
पंतप्रधान मोदींशिवाय कोणत्या नेत्याला या पदासाठी पसंती? नितीन गडकरींची टक्केवारी पाहा
marathi bhasha din
मराठी भाषा दिन ‘२७ फेब्रुवारी’लाच का साजरा केला जातो? जाणून घ्या खरं कारण

मराठी भाषेतील मजेशीर Tongue Twisters

 1. ता तम तंतू तता तता तंतम ततौतु तततत तम तेतततोता तोतोतंते तततततेतितेतूत
 2. तार तार तरैरे तेरूत्तरतोरुतइ रतारतारीतिररोती तिरेतिरेतरौतरौ
 3. मित्रात्रीपुत्रनेत्राय त्रैशास्त्रवशस्त्रवे
  गोत्रात्री गोत्रजत्राय गोत्रात्रेत्रे नमोनम:
 4. नमामि मामनो नुन्नम मानन् मुनी ममानिन् ननानन् ममानाम् मोनाम् नमुनम् मुनूम
 5. चटईला टाचणी टोचली
 6. कमला काकूने कमलेश काकाचे कामाचे कागद काळया कात्रीने कराकरा कापले
 7. पंतोबाची पिवळी पिवळी पगडी पुण्याच्या पर्वतीच्या पस्तिसाव्या पायरीवरून पाचव्या पायरीवर पडली
 8. फडकं मळकं, मडकं मळकं, मळक्या फडक्याने मळकं मडकं पुसलं तर फडक्याचा मूळ मडक्याला आणि मडक्याचा मळ फडक्याला
 9. काळे राळे, गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले.

काय मग मंडळी, जीभ वळतेय का? कदाचित पहिल्याच वेळी शक्य होणार नाही पण सरावाने तुम्हीही वर दिलेले ट्विस्टर्स सहज बोलू शकाल. ऑल द बेस्ट!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi language tongue twisters that will help you learn and speak proper marathi check mantra svs

First published on: 17-12-2022 at 15:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×