Marathi Rajbhasha Din 2025 Wishes Messages : १ मे महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशीच महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा गौरव म्हणून मराठी राजभाषा दिनही साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, याच दिवशी मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली.
वसंतराव नाईक सरकारने १९६५ मध्ये १ मे हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करावा हा ठराव मांडला. यासंदर्भातला अधिनियम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १९६६ पासून तो अंमलात आला. तेव्हापासून म्हणजेच १ मे १९६६ पासून अर्थात मागच्या ५९ वर्षांपासून १ मे या दिवशी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येतो.
दरम्यान मराठी भाषा टिकवण्यासाठी तिच्या सन्मानासाठी संतांसह अनेक थोर व्यक्तींनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे १ मे मराठी राजभाषा दिन हा प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती अन् साहित्याचा हा गौरवाचा क्षण आहे. (Happy Marathi RajBhasha Status In Marathi)
या मराठी राजभाषा दिननिमित्ताने तुम्ही मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवू शकता. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या माध्यमातून शुभेच्छांसह HD Image, Greeting पाठवत मराठी राजभाषा दिन साजरा करू शकता. (Marathi RajBhasha Din 2025 Wishes, Messages, Quotes, Status Greetings in Marathi)
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा | Happy Marathi RajBhasha Din 2025 Wishes In Marathi
“गतजन्माची पुण्याई, जन्म मराठीत लाभले।
पुण्य माझे शत जन्माचे, सार्थकी हे जाहले।
हे भाग्य म्हणावे की कर्म माझे, मी मराठी जाहलो,
धन्य माझी ती माय मराठी, जिच्या पोटी मी आलो।
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी म्हणजे गोडवा,
मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी,
मराठी म्हणजे महाराष्ट्र,
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
प्रत्येक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा,
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! (Happy Marathi Rajbhasha 2025 Shubhechha In Marathi)
माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी,
बात मराठी, साथ मराठी
जगण्याला या अर्थ मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लोकसत्ता.कॉमतर्फे वाचकांनाही मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!