Margashirsha Guruvar 2025 start date: मार्गशीर्ष महिना येत्या दोन दिवसांनी सुरू होईल. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा नववा महिना आहे. हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि सुख- समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रुपाची पूजा केली जाते.

यंदा मार्गशीर्ष महिना २१ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.या महिन्यात ४ मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जाणार आहेत. पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार (Margshirsha Guruvar 2025 Dates)

पहिला गुरूवार: २७ नोव्हेंबर

दुसरा गुरूवार: ०४ डिसेंबर

तिसरा गुरूवार: ११ डिसेंबर

चौथा गुरूवार: १८ डिसेंबर

मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व (Margashirsha First Guruvar)

आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची? (Margashirsha Guruvar Puja Vidhi)

मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा, आता चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. यानंतर विधीवत पूजा करा, आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)