Margashirsha Guruvar Vrat 2021 Wishes in Marathi : मार्गशीर्ष गुरूवार निमित्त शुभेच्छा संदेश, Messages, WhatsApp Status, Facebook Post द्वारे साजरा करा महालक्ष्मीचं व्रत!

डिसेंबर म्हणजेच मराठी मार्गशीर्ष महिना, या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत यंदाच्या वर्षी ९ डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार साजरा होणार आहे. म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदाच्या श्रीमहालक्ष्मीचे व्रताच्या निमित्ताने तुमच्या जवळच्या नातेवाईकांना या दुहेरी संकटाला सामोरे जाण्यासाठी उर्जा देणारे सकारात्मक शुभेच्छा संदेश पाठवून हे व्रत साजरा करा.

Margashirsha-Guruvar-2021-Messages

Margashirsha Guruvar 2021 Messages: डिसेंबर म्हणजेच मराठी मार्गशीर्ष महिना, या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. यंदाच्या वर्षी ९ डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार साजरा होणार आहे. श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं मानलं जातं. चार गुरुवार हे व्रत केले जाते. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. यंदाच्या वर्षी करोनापाठोपाठ आता ओमायक्रॉनमुळे आता देशावर दुहेरी संकट घोंगावत आहे. म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदाच्या श्रीमहालक्ष्मीचे व्रताच्या निमित्ताने तुमच्या जवळच्या नातेवाईकांना या दुहेरी संकटाला सामोरे जाण्यासाठी उर्जा देणारे सकारात्मक शुभेच्छा संदेश पाठवून हे व्रत साजरा करा.

Margashirsha Guruvar 2021 Wishes in Marathi | मार्गशीर्ष गुरूवार निमित्त शुभेच्छा संदेश

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा!
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!

समृध्दी यावी सोनपावली उधळणं व्हावी
सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
इंद्रधनुश्याचे रंग फुलावेत
शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार व्रताची !

शुभ गुरुवार!!!
सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा, हीच महालक्ष्मी चरणी इच्छा…
मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा…
शुभ प्रथम मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन!!
शुभ सकाळ ! तुमचा दिवस आनंदात जावो!

र्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोऽस्तुते ।
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

मार्ग- मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष- शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे
गुरू- गुरू असा असावा की ज्याच्या कडून
वार- वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे.
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पुर्ती आणि भरभराटीचा असावा हीच प्रार्थना.. मार्गशीर्ष प्रथम गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा !!! सर्वांना मार्गशीर्ष प्रथम गुरुवारच्या !! हार्दिक शुभेच्छा!

मार्गशीर्ष महिना सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य व धनसंपदा देणारा जावो हीच सदिच्छा!!

ॐ महालक्ष्मी नमः ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

झालं ना जेवण करून?
मग लवकर झोपा
उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरूवार आहे
सर्व माता-भगिनींना महालक्ष्मी व्रताच्या खूप खूप शुभेच्छा!

आणखी वाचा : Margashirsha Guruvar Vrat : मार्गशीर्षातला पहिला गुरूवार; घट मांडणी, स्थापना, पूजा विधी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Margashirsha Guruvar 2021 Whatsapp Status in Marathi | मार्गशीर्ष गुरूवार निमित्त व्हॉट्सअप स्टेटस मराठीत

आजपासून सुरू होणारे
मार्गशीर्ष महिन्यातले गुरूवार व्रत
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख, समृद्धी आणि आनंद देवो,
मार्गशीर्ष गुरूवात व्रतानिमित्त खूप खूप शुभेच्छा !!!

आजपासू सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील
पहिल्या गुरूवारच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहो,
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो,
महालक्ष्मीव्रताचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो,
घरची लक्ष्मी प्रसन्न तर
सारे घर प्रसन्न !!!
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरूवारच्या खूप खूप शुभेच्छा!!!

आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार.
आजपासून आपले व्रत चालू करणाऱ्या तमाम भगिनींना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत !!!

ॐ श्री लक्ष्मी दैवे नमः
मार्गशीर्षचा पहिला गुरुवार
आपण सर्वांना शुभेच्छा.
देवी लक्ष्मीची कृपा सगळ्यांवर व्हावी…
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरूवारच्या शुभेच्छा !

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरूवारच्या शुभेच्छा !

आणखी वाचा : Sagittarius 2022 Career Horoscope: धनु राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल, करिअरमध्ये नशीब साथ देईल!

Margashirsha Guruvar 2021 Facebook Post | मार्गशीर्ष गुरूवार निमित्त फेसबुक पोस्ट

हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव मनी,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
महालक्ष्मी व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरूवार!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
महालक्ष्मी व्रताच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप आणि सजवा कलश
धनधान्य आणि सुख-समृध्दी लाभल तुम्हा
जीवनी मंगलदायक उत्सवात
महालक्ष्मीचे व्रत जपा मनी!
महालक्ष्मी व्रताच्या हार्दिक शुभेच्छा !

आई लक्ष्मीच सदैव तुमच्या डोक्यावर हात असो ,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण पसरो ,
घरात काम सुख आणि शांति पसरलेली असो ,
तुमच्या आयुष्यात खूप सार प्रकाश असो ,
मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीव्रता निमित्त खूप खूप शुभेच्छा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Margashirsha guruvar vrat 2021 messages wishes images quotes photos greeting whatsapp status and facebook post in marathi to shared with family and friends on auspicious day prp

ताज्या बातम्या