scorecardresearch

Video:’हॅप्टिक ग्लोव्हज’ वापरून अभासी जग जगण्याची अनुभूती; फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी घेतला अनुभव

सोशल मीडियात बोलबाला असलेल्या फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नव्या प्रयोगाची अनुभूती घेतली.

Mark_Zukerburk_Heptic_Hand
Video:'हॅप्टिक ग्लोव्हज' वापरून अभासी जग जगण्याची अनुभूती; फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी घेतला अनुभव (Photo-Facebook Video)

तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत आहे की, रोजच नव्या बाबी समोर येत असतात. सोशल मीडियात बोलबाला असलेल्या फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नव्या प्रयोगाची अनुभूती घेतली. याबाबतचा व्हिडिओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. यात अभासी जगातील जगणं वास्तविक जगण्याचा प्रयत्न दिसून आला. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये गोष्टी पाहण्यासाठी मार्क झुकरबर्ग याआधी अनेक वेळा व्हीआर हेडसेट घातलेला दिसले आहेत. आता आभासी जगातील वस्तू वास्तविकतेमध्ये अनुभवताना दिसत आहेत. “हॅप्टिक ग्लोव्हज” वापरून फासे फेकणे, जेंगा आणि बुद्धिबळ खेळणे, हस्तांदोलन करणे यासारख्या गोष्टी अनुभवल्या.

“मेटाची रिअॅलिटी लॅब टीम मेटाव्हर्समध्ये स्पर्शाची वास्तववादी भावना निर्माण करण्यासाठी हॅप्टिक ग्लोव्हजवर काम करत आहे,” व्हिडिओला मार्क झुकरबर्ग यांनी असं कॅप्शन दिले. आभासी वस्तूंना स्पर्श करता तेव्हा तुम्हाला पोत आणि दबाव जाणवू शकता. त्याचबरोबर व्हर्च्युअल रिअॅलिटी सीनमध्ये त्या व्यक्तीचे हात कुठे आहेत आणि ते आभासी वस्तूच्या संपर्कात आहेत का आणि कसे हे निर्धारित करण्यासाठी हातमोजे परिधान करणाऱ्याच्या हातांचा मागोवा घेतला जातो. कंपनी सात वर्षांपासून ‘हॅप्टिक ग्लोव्हज’वर काम करत आहे.

“हे हातमोजे तयार करणे हे एक आव्हान आहे. ज्यासाठी वैज्ञानिक संशोधन वेगाने होणं आवश्यक आहे,” असे प्रकाशनात म्हटले आहे. “आम्ही अजूनही या संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असताना, एक दिवस तुमच्या व्हीआर हेडसेटसोबत हातमोजे जोडणे, आमचं ध्येय आहे. मेटाव्हर्समध्ये मैफिलीत खेळणे किंवा पोकर गेम खेळणे यासारख्या तल्लीन अनुभवासाठी, आणि शेवटी ते त्यांच्यासोबत काम करतील.” असं देखील सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 11:27 IST

संबंधित बातम्या