scorecardresearch

Happy Teddy Day 2018 : जाणून घ्या कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो?

या रंगाचा टेडी मिळणं निश्चितच सकारात्मक नाही.

teddy
टेडी डे

उद्याचा दिवस कोणता हे सहसा लक्षात न ठेवणारी काही मंडळी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच एका खास दिवसाच्या तयारीला लागतात. तो दिवस म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डे. मुळात प्रेमाची उधळण करणारा हा दिवस उजाडण्यापूर्वी रोझ डे, प्रपोज् डे असा संपूर्ण आठवडाच साजरा केला जातो. यंदाची व्हॅलेंटाइन्स डेचा उत्साह पाहायला मिळत असून, आता उजाडला ‘टेडी डे’. प्रपोज आणि चॉकलेट डेच्या मागोमाग येणाऱ्या या टेडी डेच्या दिवशी एक सुरेख असा टेडी बेअर आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याला बेरचजण प्राधान्य देतात. पण, हे टेडी बेअर देत असताना त्या प्रत्येक टेडीच्या रंगामागेही काही अर्थ आणि भावना दडल्या आहेत. जाणून घ्या नेमक्या त्या भावना आहेत तरी कोणत्या…..

निळा टेडी-
निळा रंग आसमंताचा आहे. आकाश अनंत असतं. या रंगाचा टेडी जर तुम्हाला मिळाला तर समोरची व्यक्ती ती वेड्यासारखी तुमच्या प्रेमात पडली आहे असं समजावं.

लाल टेडी
याचा अर्थ काही वेगळ्याने लावायची गरज नाही. लाल रंग प्रेमाचा आहे. तसंच तो या प्रेमाची भावना किती उत्कट आहे हेसुद्धा दर्शवतो. लाल रंगाचा टेडी बेअर देणं म्हणजे त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी निश्चितच प्रेमाची भावना आहे हेच दिसतं

गुलाबी टेडी
गुलाबी टेडी मिळणं सगळ्यात चांगलं. कारण मला तू आवडतोस किंवा आवडतेस हा संदेश गुलाबी टेडीपेक्षा वेगळं गिफ्ट सांगूच शकत नाही.

नारिंगी टेडी
लाल रंगाच्या जवळ जाणारा नारिंगी रंगाचा टेडी तुम्हाला मिळाला तर, ‘बात अच्छी है’. हा टेडी बेअर तुम्हाला देणारी व्यक्ती लवकरच तिच्या मनातल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणार आहे असं यावरून सूचित होतं.

पिवळा टेडी
पिवळा रंग एक रंग म्हणून चांगला मानला जातो. पण टेडी डे च्या दिवशी जर कोणाला पिवळा टेडी बेअर मिळाला तर तो देणाऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीशी ब्रेक अप केला आहे असं समजलं जातं

चॉकलेटी टेडी
चॉकलेटी रंगाचा टेडी बेअर सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे पण एक महत्त्वाची बाब म्हणजे हा टेडी मिळण्याचा अर्थ ती किंवा तो तुमच्यावर नाराज आहे असा अर्थ होतो. तेव्हा जर तुम्हाला हा टेडी मिळाला तर तुमच्या प्रिय व्यक्तीची समजूत काढायला तयार रहा.

हिरवा टेडी
हिरव्या टेडीचा अर्थ आहे की समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमासाठी थांबायला तयार आहे. या टेडीचा अर्थ निश्चितच पाॅझिटिव्ह घेतला जातो.

काळा टेडी
हा टेडी मिळणं निश्चितच सकारात्मक नाही. तुमच्या प्रेमाला समोरच्या व्यक्तीने नकार दिला आहे हे यावरून स्पष्ट होतं.

 

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-02-2018 at 11:00 IST