How to meditate : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात घर, ऑफिस आणि अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तणाव येतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
जर तुम्ही नियमित ध्यान केले तर याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ध्यान कसे करावे? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.
ध्यान कसे करावे?
- ध्यान करताना शांत जागा निवडावी. शांत ठिकाणी तुमचे मन स्थिर राहील आणि तुम्ही शांतपणे ध्यान करू शकाल.
- सुरुवातीला डोळे बंद करावे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. दीर्घ श्वास घेतल्यामुळे तणाव आपोआप कमी होतो.

कोरा चहा नेहमी प्यायल्याने डायबिटीक रुग्णांना मिळतात ‘हे’ मोठे फायदे; अभ्यासातून समोर आली माहिती

पालकांनो, तुमची मुले अभ्यास करत नाहीत? ‘या’ टिप्स वापरून पाहा; न सांगता करतील अभ्यास….

डाएट कोला प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते का? नवीन अभ्यासातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती….

स्क्वॅट्समुळे तुमचे पाय कसे होतील मजबूत? कसे करावे स्क्वॅट्स? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
- ध्यान करताना निवांत बसावे आणि ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला आरामदायक वाटत असेल ते कपडे घालावे. यामुळे ध्यान करताना तुमचे मन आणखी स्थिर राहील.
- ध्यान करताना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर लक्ष केंद्रित करा. त्या त्या अवयवांचे दुखणे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळेसुद्धा तणाव कमी होऊ शकतो.
- एखादी प्रार्थना किंवा धार्मिक मंत्र किंवा प्रेरणादायी शब्दांचा जप करा. कारण यामुळे ध्यान करताना लवकर लक्ष केंद्रित करता येऊ शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)