scorecardresearch

‘अशी’ बोटे असणाऱ्या पुरुषांना टक्कल पडण्याचा धोका जास्त? तज्ञ काय सांगतात जाणून घ्या

अयोग्य जीवनशैली आणि केसांची योग्य निगा न राखणे, प्रदूषण, रोग अशा अनेक कारणांमुळे पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वाढत आहे.

Hair care Tips
आजकाल केस गळतीची समस्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. (Photo : Freepik)

आजकाल केस गळतीची समस्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. केस गळणे हे पुरुषांसाठी जितके त्रासदायक आहे तितकेच महिलांसाठीही आहे. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला सुंदर आणि निरोगी केस हवे असतात. तुमच्या लूक आणि व्यक्तिमत्त्वात केसांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच आपले केस गळावे असे कोणालाच वाटत नाही. पण अयोग्य जीवनशैली आणि केसांची योग्य निगा न राखणे, प्रदूषण, रोग अशा अनेक कारणांमुळे पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वाढत आहे. अनेकांचे केस तर खूप कमी वयात गळतात. पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या टाळण्यासाठी जगभरात अनेक संशोधन केली जातात.

टक्कल पडण्याच्या समस्येचा बोटांशी संबंध आहे?

कदाचित आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु तैवानमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून एक अशी माहिती समोर आली आहे की, ज्या पुरुषांची तर्जनी अनामिकापेक्षा लहान असते त्यांना टक्कल पडण्याची शक्यता सहा पटीने जास्त असते. शास्त्रज्ञांना संशोधनात असे आढळून आले की, उजव्या हाताच्या अनामिकेची जास्तीची लांबी पुरुषांच्या टक्कल पडण्याच्या समस्येशी संबंधित आहे.

हेही वाचा- कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते का? काय सांगतात संशोधक, जाणून घ्या

या संशोधनासाठी, शास्त्रज्ञांनी ३७ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २४० पुरुषांच्या हातांचे विश्लेषण केले ज्यांची एंड्रोजेनिक एलोपेशिया नावाची स्थिती होती. ज्याला पॅटर्न बाल्डनेस (पुरुषांमध्ये टक्कल पॅटर्न) म्हटलं जाते. टक्कल पडणे सहसा तेव्हा उद्भवते जेव्हा सेक्स हार्मोन डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनचे जास्त उत्पादन होते, ज्याचा केस वाढीच्या चक्रावर परिणाम होतो. तैवानमधील संशोधकांचा असा विश्वास आहे की, बोटांची अतिरिक्त लांबी हे या टेस्टोस्टेरॉनच्या जास्तीचे लक्षण असू शकते जे केसांच्या छिद्रांना संकुचित करते.

तैवानमधील काओशुंग मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक डॉ चिंग-यिंग वू म्हणतात, “आमच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की उजव्या हाताच्या चौथे बोट हे दुसऱ्या बोटापेक्षा जितके कमी असेल तितके टक्कल पडण्याचा धोका जास्त असतो.” तज्ञांचे म्हणणे आहे की, मोठी अनामिका पुरुषांमध्ये उच्च टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या जोखमीशी संबंधित आहे. या सेक्स हार्मोनच्या अतिरेकाचा संबंध हृदयविकार, शुक्राणूंची संख्या कमी होणे आणि पुरुषांमध्ये ऑटिझम तसेच टक्कल पडणे यांच्याशी संबंधित आहे.

हेही वाचा- किडनी हळू हळू पूर्ण निकामी व्हायच्या आधी शरीर देऊ शकते ‘ही’ ७ लक्षणे! लहान मुलांमध्येही वाढलेला धोका ओळखा

एंड्रोजेनिक अलोपेसिया म्हणजे काय?

पुरुषांच्या केस गळण्याच्या समस्येला एंड्रोजेनिक अलोपेसिया (Androgenic Alopecia) असे म्हणतात. या स्थितीत केसांचे फॉलिकल्स हळू हळू मरतात ज्यामुळे नवीन केसांची वाढ होत नाही. केसांच्या रोमांजवळील रक्तवाहिन्या नसल्यामुळे ही समस्या उद्धवते.

पुरुष पॅटर्न टक्कल (बाल्डनेस) पडण्याची लक्षणे –

जर तुमचे केस सतत गळत असतील आणि तुम्हाला टक्कल पडत असल्याचे जाणवत असते तर हे पॅटर्न टक्कल पडण्याचे लक्षण आहे. डिफ्यूज थिनिंग हेदेखील पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे एक लक्षण असू शकते. यामध्ये केस कमी होण्याऐवजी पातळ होतात. तसेच माथ्यावरील केस पातळ होणे हे देखील टक्कल पडण्याचे लक्षण असू शकते.

उपचार –

तुम्हाला टक्कल पडत आहे असे वाटत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांच्या सल्लाने केस गळती मोठ्या प्रमाणात रोखली जाऊ शकते. यासाठी अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:29 IST

संबंधित बातम्या