मासिक पाळी ही मुलींमध्ये होणारी एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. या वेळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आजारांचा धोका वाढतो. यात आजकाल बाजारात अनेक इंटिमेट वॉश प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. पण ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण योनीमार्गाचा भाग हा खूप नाजूक असतो. डॉक्टरांच्या मते, प्रायव्हेट पार्टची पीएच लेव्हलही वेगळी असते, ज्याची योग्य देखभाल न केल्यास यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो. यात अनेक महिला योनीमार्ग साबण किंवा इंटिमेट वॉशने स्वच्छ करतात जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान योनीमार्ग कसा स्वच्छ ठेवायचा, तो स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत कोणती हे हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता कुन्नैयाह यांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊ…
मासिकपाळीदरम्यान योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी साबण वापरावा का?
मासिक पाळीदरम्यान योनीमार्गाची चांगली स्वच्छता राखण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीच्या प्रक्रियेतून जावे लागते. यादरम्यान योग्य काळजी न घेतल्यास योनीमार्गाच्या बाजूची त्वचा काळी पडणे, खाज येणे, पुरळ येणे आणि इतर समस्या जाणवू लागतात. यामुळे वेळोवेळी पॅड, टॅम्पुन्स आणि मेन्स्ट्रुअल कप बदलणे आवश्यक आहे. या दिवसांत तुम्ही इंटिमेट वॉश किंवा साबण वापरून प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केला तर ते चुकीचे ठरेल.




कारण या प्रॉडक्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये योनीच्या सामान्य क्लिनिंग सायकलमध्ये व्यत्यय आणण्याची क्षमता असते. त्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता वाढते.
योनी स्वतः करते आपली स्वच्छता
मासिक पाळीदरम्यान योनीची स्वतःची एक नॅचरल क्लिनिंग प्रोसेस असते. या वेळी योनी स्वत: नको असलेले घटक बाहेर टाकत असते. यामुळे योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी साबण वापरणे चुकीचे मानले जाते, कारण यामुळे योनीमार्गाच्या पीएच लेव्हलमध्ये अडचणी येऊ शकतात.
…मग योनीमार्ग स्वच्छ कसा करावा?
जर तुम्हाला मासिक पाळीदरम्यान इंटिमेट वॉश करायचे नसेल, पण तुम्हाला योनीमार्ग स्वच्छ राहवा असे वाटत असेल तर तुम्हील कोमट पाण्याचा वापर करू शकता. कोमट पाण्याने तुम्ही योनीमार्ग स्वच्छ करू शकता. यासोबत तुम्ही सौम्य साबणदेखील वापरू शकता.
योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी टिप्स :
१) मासिक पाळीच्या दरम्यान योनीमार्ग योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.
२) योनीमार्गाची नॅचरल पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी नेहमी सौम्य क्लीन्सर वापरा.
३) मासिक पाळीचे कप ६ ते ७ तासांच्या आत धुऊन निर्जंतुक केले पाहिजेत.
४) सॅनिटरी पॅड वापरत असल्यास, कॉटन पॅड वापरा. योनीमार्गामध्ये खूप घाम येत असल्यास, खाज सुटू नये म्हणून तो भाग नियमितपणे पाण्याने स्वच्छ करा.
५) योनीमार्गाचा पीएच राखण्यासाठी, खाज सुटणे किंवा कोरडेपणा टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
६) शक्य झाल्यास दर चार तासांनी पॅड बदला.