ग्राहकांना सर्वोत्तम श्रेणीचा अनुभव देण्याची वचनबद्धता अधिक बळकट करत, एमजी मोटर इंडियाने आज ग्लोस्टर सॅव्हीची सेव्हन-सीट व्हर्जन लॉंच केली आहे. भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयूव्हीच्या श्रेणीत एमजी ग्लोस्टर सॅव्ही ट्रिमचे नवीन व्हर्जन, या श्रेणीला आणखी बळकटी देईल. तसेच ग्राहकांना एमजीच्या टॉप एंड एसयूव्हीच्या व्यापक श्रेणीतून निवड करण्याचाही पर्याय मिळेल.

किती आहे किंमत?

३७.२८ लाख रुपये (एक्स-शोरूम नवी दिल्ली) किंमतीची, नवी ग्लोस्टर सॅव्ही सेव्हन सीटर (२+३+२) कॉन्फिगरेशनमध्ये येते. यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) आणि बोर्गवार्नर ट्रान्सफर केससह अनेक ड्रायव्हिगं मोड येतात. याद्वारे ऑफ रोडिंगच्या क्षमताही वाढते. यात आयस्मार्ट टेक्नोलॉजी, ६४ कलर अँबिएंट लायिटंग, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरुफ, ड्रायव्हर सीट मॅसेंजर आणि इतर अनेक सुविधा येतात.एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, ७ सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लोस्टर सॅव्ही सादर करत आहोत. सध्याच्या ६ सीटर कॉन्फिगरेशनच्या ग्लॉस्टर सॅव्हीमध्ये आणखी भर घालत आम्ही ग्राहकांना त्यांची गरज आणि पसंतीनुसार वाहन निवडण्याची शक्ती प्रदान करत आहोत.”

७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्हीअंतर्गत ६-सीट काउंटर पार्टप्रमाणेच, २.० ट्विन टर्बो डिझेन इंजिन, जे २०० पीएस पॉवर आणि ४८० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. प्रीमियम एसयुव्हीमध्ये युनिक, इंडस्ट्री फर्स्ट माय एमजी शिल्ड ओनरशिप पॅकेज येते. याअंतर्गत ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या गरजांसह, कार ओनरशिपच्या अनुभवातही बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्राहकांना २००+ पर्यायांमधून अतिरिक्त सेवा आणि मेंटेनन्स पॅकेज कस्टमाइज करण्याची संधी प्रदान करण्याबरोबरच, माय एमजी शील्डच्या स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये तीन वर्षे /१००,००० किलोमीटरची वॉरंटी, ३ वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि ३ वर्षांची ठराविक कालावधीअंतर्गत लेबर फ्री सर्व्हिस उपलब्ध आहेत.