Mi 10 5G भारतात झाला लॉन्च, 5G कनेक्टिव्हिटीसह मिळेल तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा

आता Xiaomi चा 5G स्मार्टफोन आला , कंपनीचा भारतातील आतापर्यंतचा सर्वात…

Xiaomi कंपनीने भारतात अखेर आपला 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला शानदार स्मार्टफोन Mi 10 5G लॉन्च केला आहे. कंपनीचा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन असल्याचं सांगितलं जातंय. Mi 10 5G मध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, 5G सपोर्ट, 3D कर्व्ह्ड डिस्प्ले , क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये हा फोन लॉन्च करताना कंपनीने या फोनच्या फीचर्स आणि किंमतीची घोषणा केली. शाओमीने या फोनसोबत एक वायरलेस चार्जरही लॉन्च केले आहे. शाओमीच्या या नव्या फोनमुळे भारतात आधीपासून असलेल्या OnePlus 8, Realme X50 Pro 5G आणि iQoo 3 या 5G सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनला तगडं आव्हान मिळेल अशी शक्यता आहे.

शाओमीने भारतीय मार्केटमध्ये Mi 10 हा फोन 5G सपोर्टसह लॉन्च केलाय पण, अद्याप भारतात 5G कनेक्टिव्हिटीची सुरूवात झालेली नाही. त्यामुळे भारतीयांना हा फोन 4G कनेक्टिव्हिटीवरच वापरावा लागणार आहे. Mi 10 5G भारतात दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनसाठी प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून 2,500 रुपये किंमतीची एमआय वायरलेस पावरबँक(10000mAh)मोफत मिळेल.  अ‍ॅमेझॉन आणि Mi.com च्या वेबसाइटवर प्री-ऑर्डरला सुरूवात झाली आहे. स्मार्टफोन खरेदी करताना नो-कॉस्ट इएमआयचाही पर्याय ग्राहकांना मिळेल. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 3,000 रुपये कॅशबॅकही मिळेल.

Xiaomi Mi 10 फीचर्स :-
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेलाMi 10 5G हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असेल. होल-पंच कटआउट आणि कर्व्ह्ड अ‍ॅमोलेड पॅनलसह या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच याच शूटस्टेडी मोडही आहे. याशिवाय दुसरा कमेरा 13 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच Mi 10 मध्ये 4,780 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली बॅटरी आहे.

किंमत :- Mi 10 5G फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mi 10 5g with 108 megapixel main camera launched in india know price specifications offers and all other details sas

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या