‘ताजमहाल’च्या धर्तीवर Microsoft चं अलिशान ऑफिस, कंपनीने नोएडात सुरू केलं ‘इंडिया डेव्हलपमेंट सेंटर’

IT इंडस्ट्रीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून बनलंय Microsoft चं नवीन ऑफिस, बघा Video

जगातील आघाडीची टेक कंपनी Microsoft ने भारतात आपलं नवीन अलिशान ऑफिस सुरू केलं आहे. कंपनीने दिल्ली-एनसीआरच्या नोएडामध्ये नवीन इंडिया डेव्हलपमेंट सेंटर(IDC) सुरू केलं आहे. जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’पेक्षा हे ऑफिस कमी नाहीये, कारण ताजमहलच्या प्रेरणेतूनच कार्यालयाची ही इमारत उभारण्यात आली आहे.

नोएडामध्ये सुरू झालेलं इंडिया डेव्हलपमेंट सेंटर Microsoft चं भारतातील तिसरं रिसर्च सेंटर आहे. बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये कंपनीचे दोन रिसर्च सेंटर आधीपासूनच आहेत. नोएडाच्या सेंटरची खासियत म्हणजे ताजमहलच्या धर्तीवर या ऑफिसचं डिझाइन आहे. या ऑफिसमध्ये ताजमहालचा एक सुंदर मोठा फोटोही लावण्यात आला आहे.

या सेंटरमध्ये डिजिटल इनोव्हेशनसाठी प्रोडक्ट आणि सर्व्हिस क्षेत्रामध्ये काम होईल. बिजनेस आणि प्रोडक्टिविटी टूल्स, आर्टिफीशिअल इंटेलिजन्स, क्लाउड आणि एंटरप्राइज आणि नवीन गेमिंग डिव्हिजनवरही या सेंटरमध्ये जोर देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. शिवाय इथे स्थानिक तरुणांना जास्त संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. IT इंडस्ट्रीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हे ऑफिस बनवण्यात आल्याचं Microsoft India चे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव कुमार यांनी सांगितलं. या नवीन ऑफिसचे फोटो आणि व्हिडिओ कंपनीने ट्विटरद्वारे शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर Microsoft च्या नवीन ऑफिसचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Microsofts new office in noida the microsoft india development center idc is inspired by the taj mahal and looks like a taj hotel sas

ताज्या बातम्या