scorecardresearch

जेवण गरम करण्याबरोबर मायक्रोवेव्ह ओव्हन ‘या’ कामांमध्ये करते मदत; लगेच जाणून घ्या

Microwave Hacks: मायक्रोवेव्ह ओव्हनचे इतर फायदे जाणून घ्या

Microwave Hacks Know its usage other than heating food can be beneficial for cooking
मायक्रोवेव्ह ओव्हनचे फायदे (Photo: Freepik)

Microwave Hacks: बऱ्याच घरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. एखादा खाद्यपदार्थ पटकन गरम करण्यासाठी आपण मायक्रोवेव्हचा वापर करतो. शिळे, उरलेले अन्न मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून खाल्ले जाते. पण फक्त अन्नपदार्थ गरम करण्यासाठीच याचा उपयोग होत नाही, तर स्वयंपाक घरातील इतर काही कामांमध्ये देखील मायक्रोवेव्ह ओव्हनची मदत होते, कोणती आहेत ती कामं जाणून घ्या.

मायक्रोवेव्ह ओव्हनचे फायदे

लसणाची पेस्ट बनवण्यासाठी
संपूर्ण लसूण घेऊन त्याचा १/४ भाग अशाप्रकारे कापा की त्याच्या कळ्या उघडतील. त्यानंतर लसूण सोलून एका वाटीत ठेवा, लसणावर एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाका. वाटीत २ चमचे पाणी टाकून क्लिंग फिल्मने व्यवस्थित झाकून मायक्रोवेव्हमध्ये १० मिनीटांसाठी ठेवा. त्यानंतर लसूण थोडा थंड झाल्यानंतर ही पेस्ट चमच्याने नीट मॅश करून घ्या. ही पेस्ट एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून हवी तेव्हा वापरू शकता.

लिंबू नरम करण्यासाठी
कधीकधी लिंबू इतके कडक असतात की त्यातून रस काढणे कठीण वाटते. अशावेळी तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनची मदत घेऊ शकता. लिंबू धुवून १५ सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, यामुळे ते नरम होईल आणि त्यातून लगेच रस काढता येईल.

आणखी वाचा: मोठया टेक कंपन्यांच्या नोकरकपातीमुळे टेन्शन आलंय? Layoff Anxiety पासून वाचण्यासाठी ‘या’ टिप्स करतील मदत

डाळ शिजवण्यासाठी
कधी अचानक गॅस संपला आणि डाळ शिजवायची असेल, तर तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनची मदत घेऊ शकता. यासाठी अर्धा कप तूर डाळ आणि अर्धा कप मसूर डाळ धुवून घ्या. दोन्ही डाळी मोठ्या मायक्रोवेवव्ह सेफ बाउलमध्ये ठेवा. चवीनुसार त्यात मीठ आणि हळद टाका. त्यानंतर बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन २० मिनीटांचे टायमर लावा. अशाप्रकारे डाळ शिजवता येईल.

यांसह बटाटे शिजवण्यासाठीही मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. यासाठी अर्धा बाउल पाण्यात बटाटे टाकून शिजवा. यासाठी ८ मिनिटांचा टायमर लावा, यामुळे बटाटे पटकन शिजवता येतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:25 IST