Milk Vs. Ragi: Which Ingredient Has More Calcium? शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्त्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियमदेखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. एकूणच आरोग्य आणि ऊर्जेची पातळी निरोगी राखण्यासाठी पोषक तत्त्वांनी युक्त आहार घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा एक पोषक घटक ज्याकडे दुर्लक्ष केले जाते, ते म्हणजे कॅल्शियम. हा अक्षरशः आपल्या शरीराचा कणा आहे; कारण आपली हाडे, जी कॅल्शियमपासून बनलेली असतात, ती शक्तीसाठी त्यावर अवलंबून असतात. आपल्यापैकी बरेच जण आपले कॅल्शियमचे सेवन वाढवण्यासाठी नैसर्गिक, दुग्धजन्य पदार्थ नसलेले पर्याय शोधतात आणि यामध्ये नाचणी एक सूपर फूड आहे.

मात्र, कॅल्शियम तर अनेक पदार्थांमध्ये असतात. जसे की, कडधान्य, मांस, अंडी, दूध. दुधात तर खूप कॅल्शियम असतात, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. दरम्यान, नाचणीमध्ये जास्त कॅल्शियम की दुधामध्ये जास्त कॅल्शियम? कॅल्शियमचा विचार केला तर दुधाच्या तुलनेत नाचणी हा खरोखरच चांगला पर्याय आहे का? चला जाणून घेऊयात.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Bride Tuji Navari song dance
“काय नाचतेय ही…”, ‘ब्राईड तुझी नवरी’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचे का आहे?

कॅल्शियम हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे आपल्या दैनंदिन शारीरिक कार्यांमध्ये मदत करते. तुम्हाला माहिती आहेच की, मानवी शरीरातील सुमारे ९९ टक्के कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये असते. हाडांच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. शिवाय, हे अत्यावश्यक खनिज स्नायूंना हालचाल करण्यास मदत करते आणि मेंदू आणि उर्वरित शरीराच्या दरम्यान संदेश वाहून नेण्यास मज्जातंतूंना मदत करते. जर आहारात पुरेसे कॅल्शियम नसेल, तर शरीर ते हाडांमधून घेते, ज्यामुळे हाडे कालांतराने कमकुवत होऊ शकतात आणि यामुळे हाडे ठिसूळ होतात; म्हणूनच तुमच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. कॅल्शियमचे काही लोकप्रिय स्त्रोत म्हणजे चीज, पपई, लिची, किवी, पालक आणि ब्रोकोली.

हेही वाचा >> Walking workout: तुम्हालाही घरात राहून कॅलरीज बर्न करायच्या आहेत का? डॉक्टरांनी सांगितला अवघ्या १२० सेकंदाचा व्यायाम

दूध की नाचणी ?

दूध की नाचणी, कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे? पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांच्या मते, दूध आणि नाचणी दोन्ही कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. मात्र, जेव्हा तुम्ही १०० मिली दूध प्याल तेव्हा तुम्हाला सुमारे ११० मिलीग्राम कॅल्शियम मिळेल. याउलट, तुम्ही १०० ग्रॅम नाचणीचे सेवन करता तेव्हा तुम्हाला सुमारे ३५० मिलीग्राम कॅल्शियम मिळेल. तर नाचणीप्रमाणे दुधापासून कॅल्शियमची समान पातळी मिळविण्यासाठी तुम्हाला तीन ग्लास दूध प्यावे लागेल. जेव्हा नाचणीचा विचार केला जातो तेव्हा त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवू शकते. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने नाचणी चांगली आहे. शिवाय, नाचणीमध्ये पोटॅशियमसारखे इतर पोषक घटक असतात, जे संपूर्ण आरोग्यासाठी मदत करू शकतात; त्यामुळे दुधापेक्षा नक्कीच नाचणी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे आणि कॅल्शियमचे प्रमाणही नाचणीमध्ये जास्त आहे.