Mira Kapoor Health Tips: आयुर्वेदात आहार आणि पोषणाबद्दल सविस्तर माहिती पुरवली जाते. प्रत्येक ऋतूमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हेदेखील आयुर्वेदात सविस्तर सांगितले आहे. आयुर्वेदात हंगामी फळे आणि भाज्यांच्या सेवनावर भर दिला जातो. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरदेखील मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक आहार आणि दैनंदिन दिनचर्येचे पालन करते. मीरा कपूरने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर शेअर केले की, ती एका विशिष्ट पद्धतीने आंबे खाते. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘समर बॅलन्स’ अशा कॅप्शनसह पोस्ट केली आहे.
मीरा कपूरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला आंबे खूप आवडतात. पण ते उष्ण असल्यामुळे खाल्ल्याने माझ्या त्वचेवर पुरळ येतात. त्यामुळेच मी दोन वर्षे आंबे खाणे टाळले. मी प्रत्येक हंगामात २ ते ३ आंबे खायचे ज्यावेळी हापूस व्यतिरिक्त इतर आंबे यायचे कारण ते मला खू आवडायचे. आता शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी मी आंब्यांसोबत दोन ताडगोळे आणि नारळाचे पाणी प्यायला सुरूवात केली आहे. मीरा कपूरच्या मते, ही पद्धत तिच्यासाठी खूप प्रभावी ठरत आहे.
क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, आंबा हे एक अत्यंत पौष्टिक फळ आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक शर्करा भरपूर प्रमाणात असतात.तसंच काही लोकांना उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यानंतर मुरूमे येणं, पोट फुगणं किंवा शरीरात उष्णता जाणवते अशा समस्या होऊ शकतात.
नारळ पाणी आणि आंब्याचा समतोल
सल्ल्गार आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी यासंदर्भात दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आंबे उष्ण प्रकृतीचे असतात ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही. तसंच काही लोकांना साखरेचे अतिसेवन, निर्जलीकरण किंवा त्वचेच्या संवेदनशीलतेमुळे अशा समस्या जाणवू शकतात. उन्हाळ्यात आंब्यासोबत नारळ पाण्याचे सेवन करणे हा एक चांगला पौष्टिक पर्याय असू शकतो. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला गारवा देण्यास आणि हायड्रेट करण्यास मदत करते.
नारळाची भूमिका
दुसरीकडे नारळाचे पाणी घामातून कमी होणारे पोटॅशियम आणि सोडियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरून काढण्यास मदत करते. आंब्यासोबत या दोन घटकांचे सेवन केल्याने डिहायड्रेशन टाळण्यास आणि अति गोड फळे खाल्ल्याने येणारा जडपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.
आंबा खाण्याची योग्य पद्धत
गरिमा गोयल यांच्या मते, समस्या अनेकदा आंब्यात नसते. तर त्याच्या अतिसेवनात असते. आंब्यासोबत शरीरातील पाण्याची पातळी वाढवणारे पदार्थ खाल्ले तर आंब्याचे सेवन मर्यादित होते आणि पोट जास्त काळ भरलेले राहते.
तज्ज्ञ सांगतात की, कोणताही पदार्थ थेट शरीरातील उष्णता कमी करत नाही. ताडगोळे किंवा नारळ पाण्यासारखे पदार्थ शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि उन्हाळ्याशी संबंधित थकवा आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. पारंपरिक खाण्याच्या सवयी समजून घेत ऋतूनुसार संतुलित आहाराचा अवलंब करण्याचे मीरा कपूर यांचे धोरण एक उत्तम उदाहरण आहे.
उन्हाळ्यातील पोषणाचा अर्थ आंब्यासारखी फळे टाळणे असा नाही. तर ती योग्य प्रमाणात आणि पुरेसे पाणी पिऊन खाणे असा आहे. त्यामुळे जर तुम्हालाही आंबे खाल्ल्यानंतर पचनाच्या आणि त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही मीरा कपूर यांची ही ट्रिक वापरू शकता.
